Hatnur Dam 
जळगाव

हतनूरला गाळाचा विळखा;यंदाही तापीतून दोनशे टीएमसी पाणी समुद्रात

हतनूर धरण भरले आहे. त्यामुळे धरणांमधून सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे. दहा मध्यम प्रकल्पही पूर्ण भरलेत.

देवीदास वाणी


जळगाव : जिल्ह्यात यंदा १२० टक्क्यांवर पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये तीन-चार वेळा अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प भरभरून वाहते झाले. हतनूरमधून (Hatnur Dam) किमान पाच-सहावेळा पूर्ण क्षमतेने विसर्ग झाला. पण, या सर्वच प्रकल्पांमधून वाहून जाणाऱ्या पाण्याचे नियोजनच नसल्याने यंदाच्या मोसमात दोनशेवर टीएमसी पाणी वाहून अरबी समुद्रास (Arabian Sea) मिळाले.


जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तापी, वाघूर, गिरणा नद्या दुथडी वाहताहेत. उत्तर महाराष्ट्रातील मोठी गिरणा आणि वाघूर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. मात्र ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ मोहीम कोठेही राबविल्याचे चित्र नाही. सर्व पाणी वाहून जात आहे.


तापीच्या पाण्याचे नियोजनच नाही
हतनूर धरण भरले आहे. त्यामुळे धरणांमधून सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे. दहा मध्यम प्रकल्पही पूर्ण भरलेत. त्यामुळे अतिरिक्त पाणी वाया जात आहे. तापी ही जिल्ह्यातील महत्त्वाची नदी, मध्य प्रदेशातली पूर्णा जळगावच्या तापीला येऊन मिळते. पुढे ती गुजरातमधून प्रवास करत अरबी समुद्रास जाऊन मिळते. ५० वर्षांपूर्वी भुसावळमध्ये हतनूर धरण बांधले गेले. भुसावळ रेल्वे, शहर, दीपनगर वीज प्रकल्प, भुसावळ, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी, जळगाव एमआयडीसी या भागांना हतनूरमधून पाणी पुरवठा होतो.


६० टक्के गाळाची समस्या
तापी, पूर्णा या नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या गाळाकडे लक्ष न दिल्याने आज हतनूर ६० टक्के गाळाने भरले आहे. काही काळानंतर हे धरण निकामी होईल. त्यामुळे तापीचे वाया जाणारे पाणी जास्तीत जास्त कसे अडवता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे. तापीचे किमान दोनशे टीएमसी पाणी गुजरातमध्ये वाहून जाते, असे म्हणत असले तरी तज्ज्ञांच्या मते २५० टीएमसी पाणी वर्षभरात गुजरातमध्ये वाहून जाते. इतक्या मोठ्या प्रमाणावर पल्या राज्याचे पाणी गुजरातेत जाणे ही चिंतेची बाब आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील नेत्यांनी, नागरिकांनी सातत्याने मागणी करुनही राज्य सरकारने ही बाब गंभीरपणे घेतलेली नाही.


पाडळसे, शेळगावही अपूर्ण

तापीवर बांधण्यात येणाऱ्या पाडळसे प्रकल्प आणि शेळगाव बॅरेज यांना वीस वर्षांचा काळ उलटूनही पूर्ण होत नाही. याउपर शासकीय अनास्था आणि राजकीय उदासीनता काय असावी? तापीचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी १९९५-९६ मध्ये अमळनेर तालुक्‍यातील पाडळसे येथील प्रकल्पासाठी ४२.२० कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली. यामुळे १४.४० टीएमसी पाणी अडविले जाणार होते. तर अमळनेर, चोपडा, धरणगाव, पारोळा, धुळे, शिंदखेडा तालुक्यांना त्याचा लाभ होणार आहे. अमळनेर, पारोळा, चोपडा हे तालुके ‘डार्क झोन’मध्ये असल्याने येथील भूजल पातळीत वाढ होण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या प्रकल्पाकडे गंभीरपणे पाहिले गेले नाही.


१४२ वरून दोन हजार ७०० कोटी
वनजमीन, पर्यावरण, केंद्रीय जलआयोग या विभागांच्या मान्यतेसाठी हा प्रकल्प अडकून पडला १९९८ ते २०१८ पर्यंत केंद्रीय आयोगाची मान्यताच घेतली गेली नाही. अखेर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता मिळवून दिली. पण, याकाळात प्रकल्पाचा खर्च १४२ कोटींवरून दोन हजार ७०० कोटींवर पोचला. त्यामुळे या प्रकल्पाला आज दोन हजार ५०० कोटींची गरज आहे. राज्यात फडणवीस शासनाच्या काळात जिल्ह्यातील भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा मंत्रिपद होते. त्यामुळे त्याच्या काळात पाडळसेला भरीव निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ते मंत्री असूनही निधी मिळवून देऊ शकले नाहीत.


काम, निधीबाबत वल्गनाच!
लोकसभा निवडणुकीत या धरणाच्या अपूर्ण कामावरून राजकारण झाले, त्या वेळी महाजन यांनी पाडळसे धरणाला निधीची सुनामी येईल असे सांगत मते मिळवली. मात्र, त्सुनामी नाही पावसाचा जलप्रलय झाला तरी निधीची साधी लाटही आली नाही. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे धोरण भाजपा सत्तेच्या काळात रुढार्थाने पुढे आले. पण, जिल्ह्यात पाणी अडविण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पाला निधीच मिळणार नसेल तर वाहून वाया जाणारे पाणी जिरवणार तरी कुठे असा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT