जळगाव : मेहरूणच्या गणेशपुरी भागातील निवृत्त शिक्षकाचे (Retired teacher) बंद घरफोडून ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरून (Theft) नेण्यात आला. याप्रकरणी मोहनसिंग बावरी (वय २०) व त्याचा साथीदार फरीद ऊर्फ गुल्ली मोहंमद मुलतानी (१९, दोन्ही रा. तांबापुरा) यांना अटक केली असून, तिसरा साथीदार अल्पवयीन असल्याने त्याला नोटीस देत आईवडिलांच्या स्वाधीन केले आहे. मोहनसिंग बावरी सराईत गुन्हेगार असून, सकाळी कारागृहातून बाहेर आला आणि सायंकाळी त्याने घरफोडी केल्याचे तपासात उघड झाले (MIDC Police Station) आहे.
निवृत्त शिक्षक युनूस कालू खान (वय ६४) १२ जुलैला सायंकाळी पाचला घराला कुलूप लावून ठाण्याकडे रवाना झाले. २९ जुलैला सकाळी साडेसहाला ते घरी आले असता, मुख्य दरवाजाचे कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याचे आढळून आले. खान यांच्या घरातून ४० हजारांची रोकड, १२ हजारांचे सोन्याचे पेंडल, सहा हजारांच्या सोन्याच्या रिंगा, ५ ग्रॅमची अंगठी, असा ६४ हजारांचा ऐवज लंपास झाला होता. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, सुधीर साळवे, साईनाथ मुंडे यांनी मोहनसिंग बावरी, गुल्ली मुलतानी, एका अल्पवयीन साथीदारांसह ताब्यात घेतले. पोलिस खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
मौजमजेसाठी घरफोड्या
मौजमजेसाठी घरफोड्या करणाऱ्या मोहनसिंग बावरी याच्याविरुद्ध १२ गुन्हे दाखल असून, नुकताच तो बलात्काराच्या गुन्ह्यात जामीनावर सुटला आहे. जामीनावर सुटला, त्याच दिवशी त्याने गणेशपुरीत घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.