farmer farmer
जळगाव

चक्‍क शेतमजूर महिलांनी केले कामबंद; ग्रामपंचायतीवर काढला मोर्चा

चक्‍क शेतमजूर महिलांनी केले कामबंद; ग्रामपंचायतीवर काढला मोर्चा

सकाळ डिजिटल टीम

यावल (जळगाव) : पेट्रोल, डिझेल, गॅससह सर्वत्र महागाईने कळस गाठला असतांना घरातील संसाराचा गाडा ओढणे कठीण झाले आहे. यात शेतावर काम करून मोलमजूरी (Farmer) करणाऱ्या मनवेल (ता. यावल) येथील शेतमजूर महिलांनी मजूरीत वाढ होण्याच्या मागणीसाठी परिसरात दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याची दखल न घेतल्यामुळे शेतमजूर महिलांतर्फे आज चक्क ग्रामपंचायतवर (manvel gram panchayat) मोर्चा नेण्यात आला. यामुळे मात्र पंचायत प्रशासन काही वेळ गोंधळले. (jalgaon-manvel-gram-panchayat-farmer-worker-strike)

तालुक्यातील मनवेल येथील शेतमजूर महिलांनी रोजंदारीत वाढ करण्यासाठी ग्रामपंचायतवर मोर्चा काढुन मागण्यांचे निवेदन दिले. शेतमजूर महिलांना शेतात दिवसभर काम करुन केवळ शंभर रुपये रोज याप्रमाणे मजूरी मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे शंभर रुपये रोज परवड नाही. रोजंदारीत वाढ करण्यासाठी दगडी व मनवेल येथील महिलांनी दोन दिवसांपासून कामावर बहिष्कार टाकला असुन, कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे संतप्त महिलांनी आज ग्रामपंचायतमध्ये येऊन ग्रामपंचायतच्या सरपंच जयश्री सोनवणे यांना निवेदन देऊन रोजंदारीत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

दवंडी देवून शेतकऱ्यांशी करणार चर्चा

मनवेल ग्रामपंचायतची आज मासिक सभा सुरु होती. सभा संपल्यावर शेतमजूर महिला व मुकडदम यांनी रोजंदारीत वाढ करण्यात यावी, या आशयाचे निवेदन दिले. यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत गावात दवंडी देण्यात येईल. गावातील शेतकऱ्यांशी रोजंदारीत वाढ करण्याबाबत उद्या (ता. ८) ग्रामपंचायत कार्यलयात चर्चा करण्यात येईल; असे आश्वासन देण्यात आले आहे. रोजंदारीत वाढ करण्यासाठी शंभरच्यावर महिला उपस्थित होत्या. यात प्रामुख्याने दगडी व मनवेल येथील लह्याबाई भिल, कल्पना कोळी, कमलबाई कोळी, वत्सलाबाई कोळी, वत्सलाबाई भालेराव सुनिता भालेराव सह इतर महिला उपस्थीत होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT