जळगाव ः मंगलमय अशा दीपोत्सवाला (Diwali Festival) वसूबारशीपासून सुरवात झाली आहे. दिवाळीचा आज दुसरा दिवस धनतेरसचा. या दिवशी नागरिकांनी घरोघरी धनाची पूजा करून, त्यात आणखी वाढ व्हावी, अशी मनोकामना केली. दरम्यान, लक्ष्मीपूजनाचे साहित्यासह नवीन कपडे, फराळ, इतर वस्तू खरेदसाठी बाजारपेठेत ( Jalgaon Market) प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र आजही होते. बाजार गेल्या दोन दिवसांपासून फुलला असून, चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. झेंडू फुलांना बाजारात मागणी होती. झेंडू फुलांचा दर साठ रुपये होता.
दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला असतो. गेल्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदा कोरोनाचे सावट मंदावले असल्याने प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. बाजारपेठेत सकाळपासून दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तसेच नागरिकांकडून केरसुणी, लक्ष्मीच्या मूर्तीसह दिवाळीला फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी केले जात आहे. तसेच कपड्यांच्या दुकानातदेखील प्रचंड गर्दी होत असल्याने दीड वर्षानंतर बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून आले.
कपड्यांच्या दुकानांत प्रचंड गर्दी
दिवाळीला प्रत्येक जण नवीन कपड्यांची खरेदी करीत असतो. दरम्यान, गेल्या वर्षी दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी केल्याने यंदा दिवाळीची खरेदी करण्यासठी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण कपड्यांची खरेदी करीत आहे. त्यामुळे शहरातील कपड्यांच्या दुकानात खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत बाजारपेठा गजबजलेल्या दिसून आल्या.
दीपोत्सावातील दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरातील धनधान्यासह राशींचे पूजन करून घरात सदैव लक्ष्मीचा सहवास असो यासाठी धनत्रयोदशीला देवतांचे मनोभावे पूजन केले. या दिवशी अनेकांनी सोने खरेदीचा मुहूर्त साधत सराफी पेढ्यांमध्ये विविध प्रकारच्या दागिन्यांची खरेदी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.