पारोळा ः समाजातील प्रत्येक घटक हा राजकारणाचा (Political) टच मध्ये येतो 2016 मध्ये आपल्या खोटे आरोप करण्यात आले. मात्र त्यातुन आपल्याला न्याय मिळाला. देशात नव्हेतर जगात पक्षाचे नेते पवार साहेब हे दीपस्तंभ आहेत.जिल्हा दौर्यावर असतांना डाॅ. सतीष पाटील (Dr. Satish Patil) यांचे प्रेम व त्यांचे पक्षातील स्थान यामुळे पारोळ्यात आपण वेळ दिला.येणार्या काळात आसुड शक्तीचा बिमोड करण्यासाठी आपण सज्ज असुन स्वागताने आपण भारावलो असुन आण्णांचा पारोळ्यातील पक्षातील पदाधिकार्यांचा गोतावळा पाहता आनंद असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) म्हणाले.
ओबीसी हक्क आरक्षण परिषदेच्या निमित्ताने पारोळ्यातील स्वागत मनोगतात ते बोलत होते. यावेळी माजी पालकमंत्री डाॅ. सतीष पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील पणन संचालक संजय पवार,कल्पिता पाटील, माजी सभापती प्रकाश जाधव,जिल्हाचिटणीस डाॅ. शांताराम पाटील मनोराज पाटील, दिगंबर पाटील, जिप सदस्य रोहन पाटील,हिम्मत पाटील, युवक तालुकाध्यक्ष योगेश रोकडे, शहराध्यक्ष कपिल चौधरी, विद्यार्थी जिल्हा चिटणीस लोकेश पवार, नगरसेवक रोहन मोरे,माजी सरपंच पराग मोरे,पंचायत समिती उपसभापती अशोक पाटील,समता परिषद तालुकाध्यक्ष संतोष महाजन,वना महाजन,अंकुश भागवत पंचायत समिती माजी सभापती रेखा पाटील,वर्षा पाटील, राष्ट्रवादी महीला तालुकाध्यक्ष सुवर्णा पाटील, अनिसा पिंजारी,अन्नपुर्णा पाटील, कल्याणी देवरे, सुनंदा शेंडे, माळी महासंघाचे शालाग्राम मालकर,डि. के. पाटील,भैय्या माने, माजी सरपंच अविनाश जाधव यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी समाज व राजकारण यांचेतील टच कसा असतो.याबाबत भाष्य करित आपल्यावर कट रचनेसाठी अनेक पैसा ओतला गेला.मात्र सत्याचा नेहमी विजय होत असतो.ओबीसी आरक्षण ही हक्कांची लढाई आहे.मतदार संघात डाॅ. सतीष यांचे नेतृत्वाखाली पक्ष वाढत असुन येणार्या पदाधिकारी यांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सत्य परेशान होता है पराजित नही - डाॅ. सतीष पाटील
मागील सरकारने भुजबळ साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.चुकीचे आरोप झाले.मात्र या आरोपातुन न्यायालयाने भुजबळ साहेबांना मुक्त केले.सत्य परेशान होता है मगर पराजित नही.अखेर सत्याचा विजय झाला.पारोळ्यात स्वागता दरम्यान केलेले मार्गदर्शन हे येणार्या काळात नेहमीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संजीवनी ठरणार असुन ओबीसी आरक्षणासाठीचा लढा देखील आपण नक्कीच जिंकु.यासाठी ओबीसी हक्क परिषदेला ता,25 रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान पालिका निवडणुकीसाठी इच्छुक भावी उमेदवारांनी डाँ सतीष पाटील यांचे निवासस्थानी एकच गर्दी केल्याचे दिसुन आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.