Minister Gulabrao Patil 
जळगाव

भाजप’ने मोर्चा काढून प्रॅक्टीस नक्की करावी-मंत्री गुलाबराव पाटील

भाजपने मोर्चा जरूर काढावा. मोर्चा कशा काढतात याची प्रॅक्टीने भाजपने करावी.

देविदास वाणी ः सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः‘ भाजप’ (BJP) एक नोव्हेंबरला ज्या मागण्यासाठी जळगाव जिल्ह्यात मोर्चा काढत आहे. त्यातील सर्व मागण्या शासनाने (State government) पुर्ण केल्या आहेत. त्यांच्या मोर्चाला अर्थ नाही. मात्र भाजपने मोर्चा जरूर काढावा. मोर्चा (Front) कसा काढतात याची त्यांनी प्रॅक्टीस भाजपने करावी. विरोधी पक्ष आहे तो त्यांचे काम त्यांनी केले पाहिजे असा अप्रत्यक्षपणे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी भाजपचे आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांना टोला लगावला.




विकास कामे करण्यापूर्वी धोरणात्मक निर्णय होण्यासाठी आज जिल्हा नियेाजन समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पुढे बोलतांना मंत्री पाटील म्हणाले, की पुढील वर्षाच्या विकास कामांची आखणी त्यात करण्यात आली. पूर्व नियोजीत बैठक घेतल्याशिवाय विकास कामांना गती येणार नसल्याने बैठक झाली. नियेाजन समितीच्या माध्यमातून विविध यंत्रणांना मिळालेला निधी खर्च करण्याचा स्पीड कमी होता. कोरोनच्या कामांमुळे तो कमी झाला. मार्चपर्यत तो स्पीड वाढलेला असेल. नियोजन सर्व कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना मी दिल्या. त्यांनीही त्या मान्य केल्या आहेत. २५ दिवसांत सर्व अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेत जावून बैठक घेवू.

‘भाजप’ने कांगावा केला!

जळगाव जिल्हयाचा अतीवृष्टीग्रस्त जिल्ह्याच्या मदत यादीत सामावेश नसल्याबाबत भाजप’ने कांगावा केला होता. कालच मी कॅबिनेटच्या बैठकीत बसून अतीवृष्टीग्रस्तांच्या मदत यादीत जळगावचे नाव टाकून घेतले आहे. जिल्ह्यात नुकसान झाले असेल अन त्यात जळगावचे नाव नसेल असे होणार नाही. ‘गुलाबराव पाटील’ येथे बसला आहे. जळगावचे नाव वगळण्याची कोणाची हिम्मत ?

एक महिन्याचे बिल भरावे
शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन जोडण्यासाठी फक्त एका महिन्याचे बिल भरण्याचे आदेशाही काल कॅबिनेटच्या बैठकीत काढून घेतले आहे. शेतकऱ्यांनी केवळ चालू महिन्याचे बिल भरावे. तशा सूचना विज कंपनीला देण्यात आल्या. आज अनेकांची विज संयोजन सूरू झाले असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले


जिल्हा बँक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न
जळगाव जिल्हा बँके निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल बाबत मी मागेही प्रयत्न केले, उद्याही करेल. मात्र काही तांत्रीक अडचणी आल्याने सर्वपक्षीय पॅनल झाले नाही. भाजपलाही स्वतंत्र पॅनलसाठी वेळ मिळाला नाही. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माझा प्रयत्न आजही आहे उद्या ही राहील. निवडणूकीनंतर जिल्हयासाठी सर्व जण एकत्र येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT