Water Supply Minister Gulabrao Patil 
जळगाव

भुजबळ,राज गेलेत..तरी सेना दिमाखात उभी- गुलाबराव पाटील

शहरातील राजे संभाजी महाराज नाट्यगृहात युवा संवाद कार्यक्रमांतर्गत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेला वाटचालीत मोठा संघर्ष करावा लागला.आपल्याच लोकांनी दगाबाजी केली. भुजबळ, राज साहेब सेना सोडून गेले. तरीही सेना उभी राहिली.


जळगाव : शिवसेनेने अनेक धक्के पचवले. राजसाहेब (Raj Thackeray) सेनेतून गेले तेव्हा काहींना वाटले, आता खरे नाही.. पण, त्यातूनही शिवसेना (Shiv Sena) सावरली, उभी राहिली व आजही आपल्यासारख्या युवासैनिकांच्या बळावर दिमाखात उभी आहे, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Water Supply Minister Gulabrao Patil) यांनी सेनेच्या कार्याचा गौरव केला.


शहरातील राजे संभाजी महाराज नाट्यगृहात युवा संवाद कार्यक्रमांतर्गत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. युवानेते वरुण सरदेसाई यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. तर व्यासपीठावर संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, आमदार चिमणराव पाटील, महापौर जयश्री महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.



नुसती पदे मिरवू नका
युवा सैनिकांना मार्गदर्शन करताना गुलाबराव म्हणाले, शिवसेनेला वाटचालीत मोठा संघर्ष करावा लागला. आपल्याच लोकांनी दगाबाजी केली. भुजबळ, राज साहेब सेना सोडून गेले. तरीही सेना उभी राहिली. आता तुमची युवासैनिकांची गरज आहे. केवळ कार्डावर छापण्यापुरती पदे घेऊ नका, तर जबाबदारी स्वीकारा. हा काम करत नाही, तो करत नाही, असे म्हूण नका. तर तुम्ही काय केले, याचा विचार करा, असे आवाहनही गुलाबराव पाटलांनी केले.


युवासंपर्क दौरा सुरु करा
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना वरुण सरदेसाई म्हणाले, मुंबई महापालिकेत अनेक वर्षांपासून आपली सत्ता आहे, विरोधी पक्ष बदलत गेला.. संघर्ष होत गेला, तरीह संघटनाच्या बळावर आपण कायम आहोत. केवळ सत्ता आली म्हणून शांत बसून राहता येणार नाही.शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शिवसंपर्क अभियानासाठी बाहेर पडले, तसा युवासंपर्क दौरा सुरु करुन संपर्क वाढवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT