Eknath Khadse-Girish Mahajan 
जळगाव

नगरसेवक गेल्याचा भाजपला नव्हे खडसेंना धक्का-गिरीश महाजन

मुक्ताईनगरात भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आहे. खडसे यांच्या कोथळी गावात त्यांचा सरपंच नाही.

कैलास शिंदे



जळगाव : बोदवड, मुक्ताईनगर येथील भाजप (BJP) नगरसेवक शिवसेनेत (Shiv Sena) गेले, ते मुळातच भाजपचे नव्हे तर खडसे (Eknath Khadse)समर्थक होते. त्यामुळे हा खडसे यांनाच खऱ्या अर्थाने धक्का असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.


मुक्ताईनगर व बोदवड येथील भाजपच्या १४ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार गिरीश महाजन म्हणाले, भारतीय जनता पक्षाला कुठलाही धक्का नाही, हे गेलेले नगरसेवक एकनाथ खडसे यांचे समर्थक होते. खडसे यांचीच ती माणसे होती, खरे तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणे अपेक्षित होती. मात्र कुणीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले नाही, मुक्ताईनगरात भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आहे. खडसे यांच्या कोथळी गावात त्यांचा सरपंच नाही. आज बोदवड येथेही तीच परिस्थिती आहे.

निवडून आलेली माणसे त्यांची होती

आता निवडणुका लागतील त्या वेळी आम्ही दाखवू भाजप तिथे काय आहे ते, गेल्या तीस वर्षांपासून खडसे तिथे भाजपचे आमदार होते, पक्षाने त्यांना मंत्री केले होते. लाल दिव्याची गाडी त्यांना दिली होती, त्यामुळे निवडून आलेली माणसे त्यांची होती. मात्र, आता ही माणसे त्यांची राहिलेली नाहीत. शिवसेना पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी ते गेलेले आहेत. मात्र येत्या पाच ते सहा महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT