Covid Care Center Covid Care Center
जळगाव

जळगाव शहरासाठी दिलासा; महापालिकेचे कोविड सेंटर तात्पुरते बंद

जळगाव शहरात रोज सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते आणि मृत्यूही अधिक होते

सकाळ डिजिटल टीम


जळगाव : एप्रिलअखेरपासून कोरोनाचा संसर्ग (corona infection) कमी होत असून, मे व जूनमध्ये संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी व बरे होणारे अधिक, असा ट्रेंड दोन महिन्यांपासून राहिल्याने जळगाव शहरातील सक्रिय रुग्णसंख्या शंभराच्या आत आली आहे. त्यामुळे महापालिकेचे (Municipal Corporation) कोविड केअर सेंटर (Covid Care Center) तात्पुरते बंद करण्यात आले आहे. (jalgaon municipal corporation covid care center temporarily close)

जळगाव शहरासाठी जूनअखेर मोठी दिलासादायक घटना समोर आली आहे. फेब्रुवारीपासून जळगाव शहरातून कोरोनाचा संसर्ग वाढीस सुरवात होऊन दुसरी लाट तीव्र होऊ लागली. मार्च ते मे या तीन महिन्यांत जळगाव शहर व जिल्ह्यातील संसर्ग झपाट्याने वाढला. जिल्ह्यात जळगाव शहरात रोज सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते आणि मृत्यूही अधिक होते. शहर हॉटस्पॉट बनले होते. शासकीय, खासगी रुग्णालयांतही बेड मिळू शकत नव्हते, अशी स्थिती होती.

लाट ओसरू लागली
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून संसर्गाची तीव्रता कमी होऊ लागली. रोज नवीन आढळून येणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक असल्याचे चित्र दिसू लागले. दोन महिन्यांपासून रोज हेच चित्र कायम राहिल्याने हजारावर पोचलेली शहरातील सक्रिय रुग्णसंख्या टप्प्याटप्प्याने कमी होऊ लागली.

दोनअंकी संख्याही नाही
दोन आठवड्यांपासून जळगाव शहरातील स्थिती अधिक सुधारली. रोजची रुग्णसंख्या दोन आकडी संख्येच्या खाली कायम राहिली. गुरुवारी प्राप्त अहवालानुसार तर शहरात एकही रुग्णाची नोंद झाली नाही. ‘डॉक्टर्स डे’ला ही जळगावकरांसाठी भेटच ठरली.

कोविड सेंटर बंद
शासकीय तंत्रनिकेतनात महापालिकेने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. त्याठिकाणी एका कक्षात कोरोना चाचणीचीही व्यवस्था आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर हे सेंटर बंद होऊन ते महाविद्यालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, नंतर लगेच दुसरी लाट आली आणि पुन्हा त्याचा ताबा घ्यावा लागला होता. दुसऱ्या लाटेतही तंत्रनिकेतन, अभियांत्रिकीच्या तीन इमारती ताब्यात घेऊन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. आता चार महिन्यांच्या तीव्रतेनंतर या सेंटरमध्ये एकही रुग्ण नसल्याने हे सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

ताब्यातच राहणार
असे असले तरी ही इमारत कोविड सेंटर म्हणून महापालिकेच्याच ताब्यात राहणार आहे. सध्या याठिकाणी कोरोना तपासणी सेंटर सुरू असून, गरज पडल्यास पुन्हा कोविड केअर सेंटरची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

सध्या रुग्णसंख्या नियंत्रणात असून, नवीन रुग्णही कमी आढळून येत आहेत. सक्रिय रुग्णसंख्या शंभराच्या आत असून, लक्षणे नसलेले रुग्ण अधिक आहे. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये रुग्ण नसल्याने ते तात्पुरते बंद केले आहे. गरजेनुसार ते पुन्हा सुरू करण्यात येईल.
-डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT