Jalgaon Municipal Corporation 
जळगाव

जळगाव मनपा महासभेत खडाजंगी;गाळेवाटप धोरणाचा ठराव मंजूर

Jalgaon Municipal Corporation ःसत्ताधारी शिवसेना व विरोधक भाजप सदस्यांच्या शाब्दीक चकमकीत महापालिकेची महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सकाळ डिजिटल टीम

आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण देताना, काही गाळे जप्त केले आहेत. त्यासंदर्भात हा विषय आहे. या निर्णयाला काही अडचण निर्माण होणार नसल्याचे सांगितले.

जळगाव : गाळेवाटपाच्या धोरणावरून महापालिकेतील (Jalgaon Municipal Corporation) सत्ताधारी व विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात खडाजंगी झाली. या शाब्दिक खडाजंगीमध्येच गाळेवाटप धोरणाचा ठराव (Market shop resolution) सत्ताधाऱ्यांनी बहुमताने मंजूर केला. विषयपत्रिकेवरील लेखापरीक्षणाचा प्रस्ताव वगळता अन्य ८२ विषयांना मंजुरी देण्यात आली. महापालिकेची ऑनलाइन महासभा महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.


त्रिपाठी-लढ्ढांमध्ये चकमक
गाळ्यांच्या धोरणाबाबत आज जर निर्णय घेतला, तर अडचण निर्माण होईल. त्यामुळे हा विषय तहकूब करावा, अशी मागणी विशाल त्रिपाठी यांनी केली. त्यावर नितीन लढ्ढा यांनी हा निर्णय महापालिकेने ताब्यात घेतलेल्या गाळ्यांबाबत असल्याने कोणतीही अडचण येणार नसल्याचा खुलासा केला. भाजप गाळेधारकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्यावरून त्रिपाठी, लढ्ढांमध्ये वाद झाला. हाच धागा पकडून रवींद्र घुगे-पाटील म्हणाले, की मनपात आमची केवळ अडीच वर्षे सत्ता होती. शिवसेनेची इतकी वर्ष सत्ता होती तर यापूर्वी का निर्णय घेतला नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला. भाजप सदस्या शूचिता हाडा यांनीही हा विषय तहकूब ठेवण्याची आग्रही मागणी केली.

आयुक्तांचे स्पष्टीकरण
आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण देताना, काही गाळे जप्त केले आहेत. त्यासंदर्भात हा विषय आहे. या निर्णयाला काही अडचण निर्माण होणार नसल्याचे सांगितले. २०१८ मध्ये शासनाने अधिनियमात दुरुस्ती केली. २०१९ मध्ये नवीन नियम झालेत. २०१८ प्रमाणे नूतनीकरण करण्याची संधी आहे. जे नूतनीकरणास पात्र आहेत त्यांना नूतनीकरण करून दिले जाईल आणि जे पात्र नाहीत ते गाळे ताब्यात घेऊन लिलाव केला जाईल, असेही आयुक्त म्हणाले. भाजपचा विरोध सुरू राहिल्यानंतरही हा विषय बहुमताने मंजूर केला.

आकृतिबंधावरून प्रशासन धारेवर
महापालिकेच्या सुधारित आकृतिबंधाबाबत चेतन सनकत यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. प्रशांत नाईक यांनी छायाचित्रकार पदाचाही समावेश करण्याची शिफारस केली. कैलास सोनवणे यांनी प्रशासनाचा प्रस्ताव मान्य असल्याचे सांगत कायदेशीर बाबी तपासाव्यात, अशी मागणी केली. महापौर जयश्री महाजन यांनी आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्यावर जाणार नाही, यादृष्टीने प्रशासनाने सुधारित आकृतिबंध तयार करून शासनाकडे पाठविण्याची सूचना केली.

मार्केट वसुलीची रक्कम विकासासाठी
नितीन लढ्ढा यांनी मार्केट वसुलीतून जमा होणारा निधी विकासकामांसाठी वापरावा, याबाबत ठराव करून ही रक्कम ‘एस्क्रो’ अकाउंटमध्ये जमा करावी, अशी सूचना केली. मार्केट वसुलीतून जमा झालेल्या रकमेतून विकासकामांसाठी प्राधान्य देण्याचा ठरावदेखील बहुमताने मंजूर करण्यात आला.

बंडखोर गटनेत्यांचे अभिनंदन
मनपातील भाजपच्या ५७ पैकी ३० नगरसेवकांनी बंडखोरी केली. त्यातून निवड झालेल्या गटनेता दिलीप पोकळे, तर उपगटनेता चेतन सनकत यांच्या अभिनंदनाचा ठराव नवनाथ दारकुंडे यांनी मांडला. मात्र, सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी या ठरावस जोरदार विरोध नोंदवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT