जळगाव ः निर्यातक्षम केळी उत्पादन व केळी घड व्यवस्थापनाची आवश्यक असलेली गरज शेतकऱ्यांनी ओळखून या बाबतचा प्रचार व प्रसार प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी (Farmers) परिसरातील गावांमध्ये देखील करावा. केळी निर्यातीकडे (Banana Export) स्थानिक युवकांना उद्योजक होण्याची संधी म्हणून पहावे. कृषी विभागामार्फत काढणीपश्चात तंत्रज्ञान यांची लिखित प्रशिक्षण आयोजित करून गावातील युवा उद्योजक कसे, उभे राहतील याबाबत देखील प्रयत्न करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी येथे केल्या.
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजना २०२१- २२ अंतर्गत कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत निर्यातक्षम केळी उत्पादन व केळी घड व्यवस्थापन या विषयाचे मौजे करंज (ता. जळगाव) ठिकाणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांना मनरेगा अंतर्गतवृक्ष लागवड, वसुंधरा अभियान या यासारख्या योजना राबवून गावाचा सर्वांगीण विकास साधावा.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, आत्माचे प्रकल्प उपसंचालक एम. ए. चौधरी, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबादचे वैभव सूर्यवंशी प्रमुख मार्गदर्शक होते. श्री. ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष केळीच्या शेतात उपस्थित राहून तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करून माहिती घेतली. अनिल सपकाळे यांना कृषिभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी सत्कार केला. करंज, धानोरा खुर्द, सावखेडा खूर्द, कठोरा, फुफणी, नंदगाव, गाढोदा शेतकरी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकऱ्यांतर्फे किरण साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.