Oxygen generated Plant 
जळगाव

‘न्हाई’ने २७ दिवसांत उभारला ऑक्सिजननिर्मिती प्लांट

Oxygen Plant Jalgaon: स्वत:पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) लक्ष घालून प्रत्येक जिल्हा, प्रमुख शहरांच्या ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्लांट उभारण्याचे निर्देश दिले.

सकाळ डिजिटल टीम

कोरोना संसर्गाची गेल्यावर्षी मार्च महिन्यात सुरवात झाल्यानंतर त्याची तीव्रता मे ते ऑगस्टदरम्यान वाढली.


जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (second wave corona) ऑक्सिजन (Oxygen) कमतरतेमुळे निर्माण झालेल्या भीषण स्थितीचा अनुभव आल्यानंतर आता देशभरात ऑक्सिजननिर्मितीचे (Oxygen generated Plant) आठशेवर प्लांट गेल्या महिनाभरात विशेष ‘टास्क’ म्हणून पूर्ण करण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेसाठी ‘पीएमओ’ने पाठपुरावा केला. जळगावात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highways Authority Jalgaon ) (न्हाई) ‘टास्क’ अवघ्या २७ दिवसांत पूर्ण करण्याचा विक्रम केला.

कोरोना संसर्गाची गेल्यावर्षी मार्च महिन्यात सुरवात झाल्यानंतर त्याची तीव्रता मे ते ऑगस्टदरम्यान वाढली. सप्टेंबरनंतर लाट ओसरू लागली. आरोग्य यंत्रणा सुटकेचा श्‍वास सोडत असताना, फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना संसर्गाने डोके वर काढले. मार्च ते मे या तीन महिन्यांत संसर्गाची तीव्रता कमालीची वाढली.

ऑक्सिजनचा तुटवडा
एप्रिल व मे महिना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वांत जास्त नुकसानकारक ठरला. याच काळात देशभरात लिक्विड ऑक्सिजनसह रेमडेसिव्हिर, टॉसलीझुमॅबसारख्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. ऑक्सिजनअभावी अनेक ठिकाणी रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या.

पीएमओ’चे टास्क
देशभरात लिक्विड ऑक्सिजनच्या तुटवड्याचा विषय इतका गंभीर बनला, की सर्वोच्च न्यायालयास त्याची दखल घ्यावी लागले. तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने या विषयात स्वत: पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) लक्ष घातले. प्रत्येक जिल्हा, प्रमुख शहरांच्या ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्लांट उभारण्याचे निर्देश दिले.

केंद्रीय यंत्रणांना सूचना
ज्या शहरांमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अथवा अन्य केंद्रीय यंत्रणांची कार्यालये आहेत, अशा यंत्रणांना हे प्लांट तातडीने उभे करावेत, अशा सूचना मिळाल्या. त्यानुसार देशभरात सुमारे आठशेपेक्षा अधिक ठिकाणी गेल्या जुलै महिन्यात ऑक्सिजननिर्मितीचे प्लांट उभे राहिलेत.

जळगावात ‘न्हाई’ची कामगिरी
जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात जुलै महिन्यात आणखी एक आक्सिजननिर्मिती प्लांट उभा राहिला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने युद्धपातळीवर या प्रकल्पाचे काम करत अवघ्या २७ दिवसांत तो उभा केला. या प्रकल्पातून दर मिनिटाला एक हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन निर्माण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

SCROLL FOR NEXT