Basalt rock 
जळगाव

पालच्या सुकी नदीत सापडले सहा कोटी वर्पांपूर्वीचे नैसर्गिक खांब

Jalgaon Forest News : महाराष्ट्रात आणि जळगाव परिसरातसुद्धा सहा कोटी वर्षांपूर्वी डायनासोरसारखे विशाल जीव आणि प्राणी वास करीत होते.

सकाळ डिजिटल टीम

पाल : पाल (ता. रावेर) गावाजवळ सुकी नदीत अत्यंत प्राचीन कालीन दुर्मिळ (Rare) अशा नैसर्गिक दगडी खांबांच्या स्वरूपात असलेल्या कोलमणार बेसाल्ट खडकाचा (Basalt rock) शोध लागला आहे. चंद्रपूर येथील भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्राचार्य सुरेश चोपणे व त्यांचे पथक गेल्या १४ ऑगस्टला पाल या पर्यटनस्थळी वनस्पती आणि दगड यांच्या अभ्यासासाठी आलेले होते. यादरम्यान सुकी नदीत वन विभागाच्या (Forest Department) रेस्ट हाउसजवळ १०० मीटर परिसरात त्यांना हा दुर्मिळ ठेवा सापडला. साधारण सहा कोटी वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रचंड ज्वालामुखीचा (Volcano) उद्रेक झाला आणि त्याच्या लाव्हारसातून तयार झालेले हे कोलमणार बेसाल्ट नावाचे दुर्मिळ नैसर्गिक खडक असल्याचा दावा प्राचार्य चोपणे यांनी केला आहे.


टकरीमुळे सातपुडा पर्वतरांग

जळगाव जिल्ह्यातील परिसर भौगोलिकदृष्ट्या अतिप्राचीन आहे. सहा कोटी वर्षांदरम्यान उत्तर क्रिटाशिअस काळात पृथ्वीवर भौगोलिक घडामोडी घडल्या आणि आजच्या पश्‍चिम घाटातून भेगी उद्रेकाद्वारे तप्त लाव्हारस जळगाव जिल्हा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत वाहत आला. या उद्रेकातून तयार झालेल्या दगडी थरांना डेक्कन ट्राप नावाने ओळखले जाते. हा ज्वालामुखी परिसर मध्य भारतात पाच लाख चौरस किलोमीटर परिसरात आणि पश्‍चिमेकडे सहा हजार ६०० फूट जाडीचा आहे. महाराष्ट्रात ८० टक्के भूभाग याच बेसाल्ट अग्नीज खडकापासून बनला आहे. पुढे जवळपास चार कोटी वर्षांदरम्यान भूभागाच्या अंतर्गत टकरीमुळे जमीन उंच होत गेली आणि सातपुडा पर्वतरांग तयार झाली.


जीवाश्‍माचे संशोधन शक्य

महाराष्ट्रात मुंबई, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ येथे यापूर्वी हे खडक आढळले. आता त्यात जळगाव जिल्ह्याचेही नाव समाविष्ट झाले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात बेसाल्ट खडकाची जाडी जास्त असून, विदर्भात ती कमी आहे. गेल्या हजारो वर्षांपासून भूक्षरण होऊन प्राचीन खडक उघडे पडत असल्याने अनेक नव्या जीवाश्माचे संशोधन होऊ शकेल. जळगाव परिसरात तप्त लाव्हारस वाहत (Flood Basalt) आला तेव्हा येथील नद्यांमध्ये पडून तो अचानक थंड झाला. त्याचे आकुंचन होऊन षटकोनी आकार घेतला आणि असे दगडी खांब तयार झाले. त्यांना कोलमणार बेसाल्ट (बेसाल्ट अश्मखांब) असे म्हणतात. इतर अनेक ठिकाणी असे पंच किंवा सप्तकोनी खांबसुद्धा आढळतात. हे खांब अगदी मानवाने ऐतिहासिक काळात मंदिरांच्या बांधकामासाठी तयार केले होते, तसेच दिसतात. त्यामुळे त्याची रचना मानवनिर्मित ऐतिहासिक खांबासारखी दिसते, असेही प्रा. चोपणे यांनी सांगितले.

प्रा. चोपणेंचे भौगोलिक संशोधन

प्रा. चोपणे यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जीवाश्म आणि भौगोलिक संशोधन केले असून, त्यांच्या घरी स्वत:चे अश्म संग्रहालय आहे. १४ ते १६ ऑगस्टदरम्यान जळगाव आणि यावल भागात अभ्यासासाठी आले असताना त्यांनी पाल, जामन्या, करजपाणी, गटऱ्या, लंगडा आंबा, वाकी, टायगर कुटी, गारखेडा आणि शिर्वेल आदी परिसरात निरीक्षणे केली. त्यांच्यासोबत जळगावचे वन्यजीव अभ्यासक रवी फालक आणि नितीन जोशी होते.

जळगाव परिसरात सुध्दा होते डायनासोरसारखे जीव
महाराष्ट्रात आणि जळगाव परिसरातसुद्धा सहा कोटी वर्षांपूर्वी डायनासोरसारखे विशाल जीव आणि प्राणी वास करीत होते. घनदाट जंगले होती; परंतु महाराष्ट्रातील या मोठ्या ज्वालामुखी उद्रेकामुळे सर्व जंगले, जीवजंतू जळून राख झाले. जवळपास ३० हजार वर्षे अधूनमधून लाव्हारस वाहत येत असे. पुढे हा प्रलय थांबला आणि नव्याने सजीव सृष्टी निर्माण झाली. त्या काळात मानव नावाचा कुठलाही प्राणी विकसित झाला नव्हता. मानवाचा विकास केवळ ५० लाख वर्षांनंतर विकसित झाला. यावल अभयारण्यात पाल येथूनच जावे लागते. हा परिसर निसर्गरम्य असल्याने प्रशासनाने येथे पर्यटनाला चालना दिली पाहिजे. येथील राजकीय नेते, प्रशासन यांनी यावल अभयारण्यात जायला सुरक्षित रस्ते आणि सुविधा पुरवून पर्यटन विकास करावा आणि अतिक्रमणापासून जंगलांना वाचवावे, असे आवाहनही प्रा. चोपणे यांनी केले आहे.

केरळमध्ये सेंट मेरी बेट याच दगडाचे असून, त्या ठिकाणी देश-विदेशातून लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येतात. त्याच धर्तीवर पाल हे पर्यटन क्षेत्रही या दगडामुळे नावारूपाला येईल आणि एक राष्ट्रीय स्तरावरील पर्यटनक्षेत्र म्हणून भर पडेल. भूगोल आणि विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभ्यास करण्यास फायदा होईल.
-प्रा. सुरेश चोपणे, भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

SCROLL FOR NEXT