jalgaon police sakal
जळगाव

एकाच वेळी ५१ गुन्हेगार हद्दपार; ‘अनलॉक’च्या पार्श्वभूमीवर मिशन

एकाच वेळी ५१ गुन्हेगार हद्दपार; ‘अनलॉक’च्या पार्श्वभूमीवर मिशन

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपद्रव माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारांसह रेकॉर्डवरील तब्बल ५१ संशयितांना पोलिस दलाने हद्दपार (Simultaneous deportation jalgaon district) केले आहे. जिल्ह्यात ‘अनलॉक’चा (unlock jalgaon) टप्पा सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. (jalgaon-police-action-mode-Simultaneous-deportation-criminals)

जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या सूचनेनुसार सर्व पोलिस (Jalgaon police) ठाण्यांच्या अंतर्गत घातक आणि उपद्रवी असलेल्या संशयितांची यादीच तयार केली असून, संबंधित गुन्हेगारांना एक वर्ष, दोन वर्षे हद्दपार केले आहे. जिल्ह्याबाहेर ते राहत असलेल्या ठिकाणी पोलिसांत त्यांना नियमित हजेरीही द्यावी लागणार आहे.

पुढचा टप्पा ‘एमपीडीए’

स्थानिक गुन्हे शाखेच्या डाटाबेसनुसार दत्तक गुन्हेगार, चाप्टर, हद्दपार-तडीपार आणि मोठ्या माशांसाठी आता ‘एमपीडीए’ प्रतीक्षेत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लॉकडाउनच्या कालखंडातही काही गुन्हेगार सक्रिय आढळून आले, तर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची डोकेदुखी ‘अनलॉक’मध्ये वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आदेशाने मिशन राबविले जात आहे.

-किरणकुमार बकाले, निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

पोलिस ठाणेनिहाय हद्दपार गुन्हेगार

जळगाव शहर : शोएब शेख युसूफ (शाहूनगर), तेजीम बेग नजीम बेग मिर्झा ऊर्फ सुल्तान मिर्झा (रा. तांबापुरा), गुड्डू ऊर्फ नईम रहेमान भिस्ती (पिंप्राळा, हुडको, जळगाव), मोहसीन खान नूरखान पठाण, अजीज रशीद पठाण, शेख सद्दाम शेख करीम (सर्व रा. गेंदालाल मिल).

शनिपेठ : आकाश ऊर्फ धडकन सुरेश सपकाळे, सागर ऊर्फ झंपऱ्या आनंद सपकाळे, विशाल लालचंद बुनकरे ऊर्फ हळंदे, सागर सुरेश सपकाळे, विशाल कैलास सैंदाणे (सर्व रा. कोळीपेठ), गौरव भरत कुंवर (कासमवाडी).

रामानंद पोलिस ठाणे : मनोज रमेश भालेराव, हितेश नाना बाविस्कर, किरण अशोक सपकाळे (सर्व रा. पिंप्राळा, हुडको), गोविंदा पीतांबर भोई, इरफान ऊर्फ इप्पो सुसूफ पठाण, सागर हरचंद भोई (सर्व रा. जळगाव).

जळगाव तालुका : प्रवीण गोकुळ सपकाळे (रा. खेडी), संतोष राजाराम पाटील (रा. चोपडा), विवेक मधुसूधन सपकाळे (रा. कांचननगर), सोमा सुकलाल मोरे (रा. खेडी), दीपक सुधाकर पाटील (रा. खोटेनगर), कैलास गौतम सपकाळे (रा. खेडी), अविनाश सोपान सपकाळे (रा. पोलन पेठ), नामदेव दिनकर कोळी (रा. असोदा), प्रदीप दगडू सोनवणे (रा. असोदा).

एमआयडीसी : पवन ऊर्फ घातक मुकुंदा सोनवणे, सनी ऊर्फ फौजी बाळकृष्ण जाधव (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), मोनूसिंग जगदीशसिंग बावरी, गुरजितसिंग सुरजितसिंग बावरी (रा. तांबापुरा), राहुल रामचंद्र बऱ्हाटे (रामेश्वर कॉलनी), गोलू ऊर्फ दत्तू नारायण चौधरी (तुकारामवाडी).

भुसावळ शहर/बाजारपेठ : भारत मधुकर महाजन, शाकीर ऊर्फ गोलू शेख रशीद, विनोद लक्ष्मण चावरिया, हेमंत जगदीश पैठणकर, चेतन ऊर्फ गोल्या पोपट खडसे, प्रशांत ऊर्फ मुन्ना संजय चौधरी.

यावल पोलिस ठाणे : विजय बंडू गजरे (रा. पंचशीलनगर, यावल).

मुक्ताईनगर : संतोष अलीस आकाश विष्णू रावलकर (रा. कुऱ्हा), संतोष गंभीर कासोदे (रा. मुक्ताईनगर).

वरणगाव पोलिस ठाणे : संतोष रघुनाथ चौधरी (हतनूर).

बोदवड पोलिस ठाणे : सागर जगदीश तोरे (रा. भिलवाडी).

एरंडोल पोलिस ठाणे : इप्पू ऊर्फ इम्रान मुन्सफखान (कासोदा).

चाळीसगाव शहर : शेख जुबेर ऊर्फ साबीर ऊर्फ बेब्बय्या शेख गालीब, विकार ऊर्फ अलाउद्दीन शेख नुरोद्दीन, शोएब ऊर्फ शरीफ ऊर्फ शप्या खान आसीफ खान, अफसर शेख आसीफ शेख, शोएब ऊर्फ उब्बर शेख कादर शेख (रा. चाळीसगाव) अशा ५१ अट्टल गुन्हेगारांना जिल्ह्या‍तून तडीपार करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT