shiv sena   shiv sena
जळगाव

सेनेचं नवनेतृत्व..दादांचा वारस अन्‌ लढ्ढांचे कार्यालय!

Jalgaon Political News: गेल्या काही वर्षांत सुरेशदादा सक्रिय राजकारणापासून दूर गेल्यानंतर जळगाव शहरातील राजकीय मैदान नेतृत्वहीन झालंय

सचिन जोशी


जळगाव ः खरंतर गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहरातील राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या माजी महापौर नितीन लढ्ढांनी (Former Mayor Nitin Ladha)अचानक संपर्क कार्यालय (Liaison office) सुरू करण्याचं कारण नव्हतं. मात्र, त्यांचे नेते सुरेशदादा जैन (Leader Sureshdada Jain) यांनी उभं केलेल्या साम्राज्यावर त्यांचं नाव घेता कुणी वारस म्हणून हक्क सांगू लागलं तर जैन यांचा कट्टर समर्थक म्हणून ‘आमचं राजकारण (Politics) संपलेलं नाही’ हा संदेश देणं गरजेचं होतं... लढ्ढांचं संपर्क कार्यालय हाच संदेश तर देत नाहीना..?

(jalgaon shiv sena leader political fights for survival)


नितीन लढ्ढा, सुनील महाजन असोत की ललित कोल्हे आणि आणखी कुणी... ही सर्व मंडळी सुरेशदादा जैन यांच्याच राजकीय महाविद्यालयात तयार झालेली. त्या-त्या वेळी ज्यांना जसं राजकारण करणं सोयीचं झालं, तसं त्यांनी ते केलं. मात्र, गेल्या काही वर्षांत सुरेशदादा सक्रिय राजकारणापासून दूर गेल्यानंतर जळगाव शहरातील राजकीय मैदान नेतृत्वहीन झालंय, असे निश्‍चितपणे म्हणता येईल.


दरम्यानच्या काळात एकनाथ खडसे व नंतर गिरीश महाजनांनी जळगाव शहरात लक्ष घालताना काही शिष्य तयार केलेत. या शिष्यांनी महापालिकेत सत्तेचं गणितही बसवलं... मात्र, हे गणित दीर्घकाळ यशस्वी ठरू शकलं नाही. अगदी २०१८च्या मनपा निवडणुकीत महाजनांच्या नेतृत्वात भाजपनं ५७ जागा जिंकण्याचा पराक्रम करूनही हे सत्ताजाल अडीच वर्षांच्या औटघटकेचंच ठरलं. पुढे जाऊन पुन्हा जैनांचा गट समजल्या जाणाऱ्या शिवसेनेच मनपावर वर्चस्व प्राप्त केलंय...


त्यामुळे खडसे, महाजनांना आजमावल्यानंतर आता पुन्हा मनपात जैन गटाची सत्ता आहे, असे म्हणता येईल. अर्थात, आता ज्यांची सत्ता आहे ते सुरेशदादांना कितपत मानतात, असा प्रश्‍न निर्माण झालांय. कारण, पालिकेच्या राजकारणात जैनांचे जे कट्टर समर्थक आहेत, ते सध्या पालिकेत सत्ताधीश असलेल्या पदाधिकाऱ्यांपासून ‘दोन हात’ अंतर ठेवूनच आहेत. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर जळगाव शहरात सेनेच्या ज्या नेत्यांनी लक्ष घालायला सुरवात केली, त्या नेत्यांशीही जैन समर्थकांनी अद्याप जुळवून घेतल्याचं दिसत नाही. अलीकडच्या काळात सेनेच्या ज्या शीर्ष नेत्यांचे दौरे झालेत, त्या दौऱ्यापासूनही जैन समर्थक मंडळी काहीशी दूरच होती. गेल्या दोन महिन्यांतील घडामोडींमध्ये सेनेत ज्यांना संघटनात्मक पदं देण्यात आली. त्या पदाधिकाऱ्यांनी अथवा जैन समर्थकांनी एकमेकांपासून ‘दो गज दुरी है जरुरी’चा नियम पाळल्याचे दिसते.


अशा राजकीय घडामोडी घडत असताना जैनांची शिवसेना किंवा आघाडी कुठेही सक्रिय नव्हती, हे प्रकर्षाने जाणवले. त्यांना एकतर डावलण्यात आले किंवा ही मंडळी जाणीवपूर्वकच दूर राहिली, असेही म्हणता येईल. या सर्व घडामोडींमध्ये खरेतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील समीकरणांची ‘झलक’ दिसते. जैनांनी तयार केलेले शिष्य शिवसेनेत ‘स्वयंभू’ म्हणून पुढे येत असताना जैन समर्थक अस्वस्थ होणे स्वाभाविकच होते. या अस्वस्थेतून म्हणा, की सेनेत वेगाने पुढे जाणाऱ्या नेतृत्वाला संदेश देण्यासाठी म्हणा... लढ्ढांनी स्वतंत्र संपर्क कार्यालय थाटलं...
लढ्ढांचे सर्वच पक्षांत चांगले संबंध असल्याने सर्वपक्षीय मंडळी या कार्यालय उद्‌घाटनाला हजर होती. सेनेच्या चिन्हाशिवाय अन्‌ सुरेशदादांच्या छायाचित्रासह सुरू झालेले हे कार्यालय म्हणूनच शहरातील राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकेल. शहर, वॉर्डातील समस्यांसाठी, कार्यकर्त्यांना बसण्यासाठी म्हणून हे कार्यालय सुरू केल्याचा लढ्ढांचा दावा असला तरी ‘जैनांचा वारसदार अद्याप ठरलेला नाही’, असा संदेशही त्यातून देण्याचा प्रयत्न असावा, हेही नाकारून चालणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Latest Marathi News Updates : प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद

IND vs AUS: विराट धावांचा भुकेला, ऑस्ट्रेलियात दुपटीने वसुली करेल, माजी भारतीय कर्णधाराचा विश्वास

Dhananjay Munde : जातीपातीचा विचार न करता विजयसिंहांना संधी द्यावी; गेवराई येथे मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन!

Assembly Election : एवढ्या जागांवर होणार पवार विरुद्ध पवार, ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप विरुद्ध काँग्रेस लढत?

SCROLL FOR NEXT