जळगाव ः शिक्षक (Teacher) प्रामाणिकपणे मेहनतीने ज्ञानदानाचे काम करीत आहेत. पुरस्काराच्या माध्यमातून त्यांचा गौरव सोहळा होतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील (Zilla Parishad school) पटसंख्या कायम टिकली असती तर राज्यातील ७० हजार शिक्षकांची भरती झाली असती. पटसंख्या टिकविण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषद शिक्षकांसमोर आहे. ते त्यांनी स्वीकारावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी केला.
येथील कांताई सभागृहात शिक्षक सेनेतर्फे आयोजित जि. प. शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सन्मान सोहळा आज झाला. त्यात ते बोलत होते. आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, महापौर जयश्री महाजन, शिक्षिका कांचन राणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, नंदकुमार पाटील, पंचायत समिती सभापती ललिता पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षल माने, माजी महापौर विष्णू भंगाळे, नाना महाजन, मनोज पाटील, राजेंद्र चव्हाण, उपशिक्षणाधिकारी विजय पवार उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, आजची शिक्षणपद्धती बदलली आहे, इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी आपले अस्तित्व वाढविले आहे. असे असले तरी जि.प. शाळांची गुणवत्ता कायम आहे. यामुळे आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे विद्यार्थी फोडण्याचे प्रमाण वाढण्याची स्थिती आहे. सर्वच शाळांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी १६ कलमी कार्यक्रम राबविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे. शिक्षकांचे पेन्शन, वेतनासह विविध प्रश्नासाठी सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडीत पाटील, संदीप पवार यांनी केले. रमेश बोरसे यांनी आभार मानले.
सन्मानार्थी शिक्षक असे :
मनीषा पाटील, नामदेव महाजन, दिनेश मोरे, योगेश घाटे, ओमप्रकाश थेटे , सोमनाथ देवराज, माधुरी देसले, पद्माकर पाटील, मोनिका चौधरी, माया शेळके, विकास पाटील, सुभाष देसले, सीमा पाटील, गजाला तबस्सुम सय्यद असगरअली, संदीप पाटील, कांचन राणे, विजय चौधरी यांसोबत गतवर्षीच्या (२०२० मधील) पुरस्कारप्राप्त शिक्षकांचाही सन्मान झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.