Thieve 
जळगाव

पारोळ्यात चोऱ्यांचे सत्र संपेना..आणि पोलिसांना चोर सापडेना

Crime News : शिक्षक हे कोरोना भितीमुळे गावातील घर बंद करुन लालबाग येथील घरात रहीवास करित होते.

संजय पाटील

सेवानिवृत्त शिक्षक जी जे भावसार यांचेकडे मागील दहा वर्षी पुर्वी देखील घरफोडी होवुन तब्बल 25 लाखाचा ऐवज गेला होता.

पारोळा ःयेथील भरवस्तीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक (Retired teacher) जी जे भावसार यांचे बंद घराचा फायदा घेत चोरट्यांना (Thieves) रोकडसह एक चांदीची गणेश मुर्ती,चार जुने आँनराईड मोबाईल,सोलापुरी चादर व काही नवी कपडे असे सुमारे 21500 हजार पर्यतचा ऐवजावर डल्ला मारल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाली आहे. तालुक्यात चोरीची मालिका सुरुच असुन पोलिसांना (Parola Police) चोर सापडत नसल्याने तालुक्यात चोरट्यांना "अच्छे दिन " आल्याचे नागरिक परिसरात बोलत होते.

याबाबत पारोळा पोलिसात सेवानिवृत्त शिक्षक जी जे भावसार यांनी फिर्याद दिली कि आज रोजी अभिजीत स्टुडिओ शेजारी असलेल्या घरातील जाळीचा व मुख्य दरवाजा तोडुन मुख्य लोखंडी कपाट व त्यातील साहीत्य अस्ताव्यस्त करुन 3500 रुपये रोख,इतर ऐवज सुमारे 18 हजार किंमतीचे असे एकुण 21500 रुपयाची चोरी करुन चोरटे पसार झाल्याचे आढळुन आले.

Thieve

कोरोनामूळे लालबागला रहिवास

सदर निवृत्त शिक्षक हे कोरोना भितीमुळे गावातील घर बंद करुन लालबाग येथील घरात रहीवास करित होते.सदरची घटना ही परिसरातील लोकांनी सांगितल्याने त्यांनी घराकडे धाव घेत घराची तपासणी केली असता चोरट्यांनी घरातील सामान व कपाट अस्ताव्यस्त करुन पोबारा केल्याचे दिसुन आले. यावेळी त्यांचे चिरंजीव पत्रकार दिपक भावसार यांनी सदर घटना पोलिसांना सांगितली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहीती जाणुन घेत चोरट्यांचा तपास लागने कामी गतीमान हालचाली सुरु केल्यात श्वानपथक व फिंगर प्रिंट यांचे पथक देखील घटनास्थळी रवाना होवुन चोर कोणत्या दिशेने मार्गस्थ झाले.याचा तपास लावत होते.

Thieve

दहावर्षापुर्वी देखील 25 लाखाची घरफोडी

सेवानिवृत्त शिक्षक जी जे भावसार यांचेकडे मागील दहा वर्षी पुर्वी देखील घरफोडी होवुन तब्बल 25 लाखाचा ऐवज गेला होता. त्यातुन सावरत नाही तोच आज पुन्हा चोरांनी साधुन घरफोडी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT