crime crime
जळगाव

धक्कादायक प्रकार..काकाच्या घरात पुतण्याने रचला दरोड्याचा कट

काहीतरी वेगळेच घडत असल्याचा संशय येऊन भीतीने चौघे दरोडेखोर पळून गेले

रईस शेख



जळगाव ः शहरातील इच्छादेवी चौकासमोरील स्वामी टॉवर्स या अपार्टमेंटमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या (Builder) घरात घडलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी (Robbery) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Crime Branch police jalgaon) ‘मास्टर माइंड’ शोधून काढला आहे. पुतण्यानेच दरोड्यासाठी चौघांना पाच लाखांची सुपारी देऊन हा प्रकार घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


(uncles house robbery brother sun conspiracy police arrested)

बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांचे बंधू प्रकाश साहित्या रेडिमेड होजिअरीसहित इतर होलसेल व्यवसाय (Constraints commodity traders) करतात. बऱ्यापैकी सधन कुटुंब असल्याने पैशांची रेलचेल असते. त्यांच्या घरी १७ मार्च २०२१च्या सायंकाळी तोंडाला कापड गुंडाळलेले चार संशयित शिरले. घरात लहान मुलांसह प्रकाश यांच्या पत्नी वंशिका यांच्यासह मुले व सर्वच भेदरले. समोरच्या व्यक्तीच्या हातात पिस्तूल असल्याने कोणी काही बोलण्याअगोदरच त्यांनी सोनं (gold) कुठे आहे, पैसा कुठे ठेवलाय, अशी चौकशी केली. मात्र, काहीतरी वेगळेच घडत असल्याचा संशय येऊन भीतीने चौघे दरोडेखोर पळून गेले होते. मात्र सीसीटीव्हीत (cctv) त्यांचे तोंड बांधलेले चेहरे आले होते. या प्रकरणी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची (District Police Station) नोंद करण्यात आली होती.


तपासाच्या सूचना
दाखल गुन्ह्यात जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेला जबाबदारी सोपविण्यात आली होती.


तपासचक्रे फिरली उलटी
दरोडा पडला आणि लाखोंचे दागिने, रोकड असताना काहीच कसे नेले नाही म्हणून पोलिस पथकाने तपासचक्रेच उलटी फिरवली. रेकॉर्डवरील संशयित अट्टल गुन्हेगारांना सोडून घरातीलच सदस्य, नातलगांवर लक्ष केंद्रित करून एकेकावर स्वतंत्र पाळत ठेवली होती.


पुतण्याचा सहभाग
त्यात सनी इंद्रकुमार साहित्या (वय २४, हरदासराम मंगल कार्यालयाजवळ) याच्यावर संशय बळावला. चौकशी केल्यावर सनीनेच गुन्हा घडवून आणल्याची माहिती समोर येऊन त्याच्या अटकेनंतर एकेक करून पाच संशयितांना अटक केली असून, धुळ्यातून सहाव्या संशयितांचा उशिरापर्यंत शोध सुरू होता.


पाच लाखांची सुपारी
तक्रारदाराचा पुतण्या सनी साहित्या याने दरोडा टाकण्यासाठी नरेंद्र अशोक सोनार (वय २५, प्रेमनगर जामनेर), उमेश सुरेश बारी (वय २५, रा. सबजेल मागे), मयूर अशोक सोनार (वय ३५, रा. डीएनसी कॉलेज, खेडी रोड) अशा चौघांसह सनी याचे दोन मित्र धुळ्यातून त्याने बोलावून घेतले होते. त्यात राकेश शिवाजी सोनवणे (वय ३५, रा. देवपूर, धुळे) आणि त्याच्या साथीदाराची ओळख पटली असून, त्याच्या मागावर गुन्हे शाखेचे पथक आहे. या एकूण पाच संशयितांना पाच लाखांची सुपारी सनी साहित्याने दिल्याची माहिती समोर येत आहे. दरोडा यशस्वी झाल्यावर जो माल मिळेल त्यातून पाच लाख रुपये देऊन उर्वरित रक्कम सनी ठेवणार होता, असे ठरल्याचे अटकेतील गुन्हेगारांनी चौकशीत माहिती दिली.


प्रकारामागे शहरातील ‘डॉन’
या सर्व प्रकरणामागे जळगाव शहरातील एका कुख्यात गुन्हेगाराचे नाव समोर येत आहे. ‘डॉन’ समजल्या जाणाऱ्या या गुंडाची एका विशिष्ट भागात बऱ्यापैकी दहशत आहे. त्याला अटक होण्याची गरज व्यक्त होत आहे.

आयपीएलचा सटोड्या
सनी इंदरकुमार साहित्या याला ऑनलाउन सट्ट्यांचा नाद आहे. त्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर सट्ट्याचे सबस्क्रीब्शन ऑनलाइन चालवल्याची माहिती असून, आयपीएल मध्येही तो सट्टाबाजार चालवत असल्याची खात्रीलायक माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे.

...या पथकाने केली अटक
सहाय्यक निरीक्षक स्वप्नील नाईक, विजयसिंग पाटील, सुनील दामोदरे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे या पथकाने ही कारवाई केली.

(uncles house robbery brother sun conspiracy police arrested)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT