जळगाव ः जिल्ह्यातील महत्वाचे असलेले वाघूर धरण (Waghur Dam) पूर्ण क्षमतेने भरले असून आज (शनिवार) सायंकाळी पाचला वाघूर धरणातून २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग (Discharge of water) नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता (Alert) बाळगावी, असा इशारा जळगाव पाटबंधारे विभागाने (Jalgaon Irrigation Department) दिला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जुलैपर्यंत चांगला पाऊस झाला नसल्याने वाघूर धरणात पाणी साठविले जात होते. मात्र गेल्या महिन्यात व या महिन्या चांगला पाऊस सुरू आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण पहिल्यांदा शंभर टक्के भरणार आहे. धरणातील पाण्याची पाणीपातळी २३४ मिटर एवढी आहे. तेथेपर्यंत पाणी पोचले आहे. त्यावर पाणी जावू लागल्यास धरणाचे दरवाजे दोन अडीच मिटरने सुरू करण्यात येतील. नंतर हळूहळू इतर दरवाजे उघडले जातील. मागील महिन्यात पाणी पातळी २३३ भरली होती. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील पाण्याची आवक बंद झाल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले नव्हते.
वाघूर नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.