Wallpainting Wallpainting
जळगाव

जळगावच्या वॉलपेंटिंगची दिल्लीलाही भुरळ; युद्धभूमी सुशोभित करणार

कारगिल विजय दिनानिमित्त कारगिलच्या युद्धभूमीवरही सुशोभीकरण केले जाणार आहे

सकाळ डिजिटल टीम



जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Medical college), रुग्णालयाच्या (Hospital) भिंतीचे सुशोभीकरण करणारे प्राचार्य डॉ. अविनाश काटे व त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या कलाकृतीची दखल दिल्लीतही घेण्यात आली. काटे दांपत्य आता दिल्लीतील सैनिकांच्या रुग्णालयासह (Soldiers' Hospital in Delhi) कारगिल युद्धभूमीवरही (Kargil War) कलाकुसर (Wallpainting) साकारून ती सुशोभित करणार आहे.(jalgaon wall painting artist painting soldiers hospital in delhi)


जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचे वॉलपेंटिंग प्राचार्य अविनाश काटे, त्यांच्या पत्नी प्रा. वैशाली यांनी मोफत केले. त्यांची दहावीत शिकणारी मुलगी अविवाने त्यांना सहकार्य केले.

‘जीएमसी’चा बदलला लुक
जीएमसीतील वॉलपेंटिंगच्या कलाकुसरीमुळे परिसरातील सौंदय खुलून रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलला आहे. या सुशोभीकरणामुळे रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्‍यांसह रुग्णांनासुद्धा प्रसन्न वाटते.

दिल्लीत दखल
या कामाची दखल जागतिक पातळीवरील दिल्लीतील फेस इंडिया फाउंडेशन फॉर आर्ट, कल्चर ॲन्ड एज्युकेशन ट्रस्टने घेतली. या ट्रस्टतर्फे उल्लेखनीय कामानिमित्त जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला ‘फेस इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड’ हे प्रमाणपत्र देण्यात आले.

युद्धभूमीवरही करणार सजावट
या वॉलपेंटिंगबाबत दिल्लीतील सैनिकांच्या रुग्णालय प्रशासनास माहिती मिळाली. प्रशासनाने काटे दांपत्याशी संपर्क साधून त्यांच्या दिल्लीतील रुग्णालयात सुशोभीकरणाच्या कामाची जबाबदारी काटे यांच्याकडे दिली आहे. तसेच कारगिल विजय दिनानिमित्त कारगिलच्या युद्धभूमीवरही सुशोभीकरणाचे काम काटे यांच्यावर सोपविण्यात आले आहे.



मुंबईतील आझाद मैदानाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कलाकृती साकारण्याचा मानसही आहे.
-प्राचार्य अविनाश काटे, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT