वाकोद, जामनेर ः तोंडापूर ता. जामनेर येथील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या पंकज दिगंबर पाटील यांने विदेशात राहून भारतीय शेतऱ्यासांठी हवामानाचा अंदाज घेणाऱ्या ॲप तयार केला आहे. हे ॲप मोफत उपलब्ध असून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
तोंडापूर गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीमती रत्नाबाई सुरेश जैन माध्यमिक विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पंकज पाटील यांनी घेतले. उच्च शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी जाऊन संगणक अभियंता ही पदवी प्रवारानगर येथे घेऊन उच्च शिक्षणासाठी अमेरीका गाठली. वडील जिल्ह्याच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ (दिगंबर केशव पाटील) असूनही राजकारणाची हवा डोक्यात न शिरू देतात त्यांनी जिद्द व चिकाटीने शिक्षण पूर्ण केले शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे बालपणापासूनच शेतीशी नाळ जुळलेली भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनातील चढ-उतार अगदी जवळून पाहिल्यामुळे व निसर्गाच्या लहरीपणाचा भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनावर होणारा परिणाम वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासारख्या समस्यांची जाणीव पंकज पाटील यांच्या संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारी होती.
उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू
विदेशात राहूनही मातृभुमीत बळीराजाने निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे हाल यातून निर्माण होणारे नैराश्य व त्याची परिणीती आत्महत्येत होताना पाहून यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न त्यांनी करायला सुरुवात केली.
नासात संशोधन
पंकज पाटील हे नासा या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या एका पेटटवर काम करीत होते जे त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले त्यांच्या या कामाची दखल नासाने यापूर्वीच घेतलेली आहे त्याबद्दल त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर लेख देखील प्रसिद्ध केला आहे
असा तयार केले ॲप
भारतीय हवामानाची अनिश्चित स्थिती व त्याविषयीचा अचूक अंदाज वर्तविणारे या यंत्रणेचा अभाव हीच खरी शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थाची कारणे आहेत यामुळेच शेतकऱ्यांना शेतीचे अचूक नियोजन करता येत नाही परिणामी त्याला यातून सावरण्यासाठी पंकज पाटील यांनी नासात कार्यरत असताना पृथ्वीभोवती फिरणारे कृत्रीम ग्रह उपग्रह व त्याद्वारे मिळणाऱ्या वातावरणातील विविध घटकांची माहिती जसे उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या छायाचित्रांवरून एखाद्या प्रदेशातील ढगांची स्थिती, पृथ्वीची पृष्ठभागापासूनची उंची, ढगांची जाडी, त्यांची बाष्पधारण क्षमता, हवेचा वेग, हवेची दिशा, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण, तापमानातील दर तासातील बदल, देशातील प्रत्येक ठिकाणचा सूर्योदय व सूर्यास्ताची अचूक वेळ, आठवड्यातील हवामानाची स्थिती इत्यादी सर्व घटकांचा सखोल अभ्यास करून उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या माहितीचा वापर करून शेतकऱ्यांसाठी हवामान या नावाचे ॲप तयार केले आहे तसेच त्यांनी एलिका जीओस्पेशल ही कंपनी सुद्धा स्थापित केली आहे ही कंपनी उपग्रहावरून मिळणाऱ्या माहितीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून महत्त्वाचा आणि उपयुक्त डाटा बनवण्याचं काम करते त्यांनी बनवलेले ॲप खाली दिलेल्या लिंक्स https://play.google.com/store/apps/details?id=com.ilikallc.hawamaan वर मोफत उपलब्ध असून हे ॲप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून विदेशात राहूनही स्व देशाबद्दल असलेली तळमळ आस्था व बांधिलकी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.