जळगाव

संतापजनक घटना : पाय बांधून चिमुकलीला जंगल रस्त्यावर फेकून दिले 

गजानन खिरडकर

कुऱ्हा काकाडो ः  कुऱ्हा काकोडा (ता.मुक्ताईनगर) येथील वायला ते चिंचखेडा हद्दीत मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगल रस्त्यावर तीन ते चार वर्षे वय असलेल्या चिमकुलीस पाय बांधून अज्ञातांनी टाकून दिल्याची संताप देणारी घटना आज समोर आली. हि बाब पोलीस पाटलांना माहिती पडताच त्यांनी मुलीचे पाय सोडून तिला जवळ घेतले व पोलिसांच्या स्वाधीन केले, यावेळी चिमकुलीस प्राथमिक आरोग्य केंद्र कुऱ्हा येथे उपचार सुरू आहे.

आज दुपारी चार वाजेच्या सुमारास जंगल रस्त्याच्या कडेला जाणाऱ्या पादचारी रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांना चिमुकलीचे पाय बांधलेल्या अवस्थेत दिसली. तत्काळ काही जणांनी ही  माहिती वायला पोलिस पाटील सुनील तायडे व चिंचखेडा पोलीस पाटील संजय तायडे यांना फोनवरून दिली. तात्काळ दोन्ही पोलिस पाटील धावून आले त्यांनी चिमकुलीचे बांधलेले पाय सोडून तिला जवळ घेतले.

मुलीला खाऊ घातले, कपडे परिधान केले

खाण्यासाठी खाऊ दिला तिला नवीन कपडे परिधान करून आजुबाजुला चौकशी करून माहिती दिली मात्र कोणीही आढळून न आल्याने कुऱ्हा पोलीस चौकीचे पोलीस नाईक संदीप खंडारे ,मेजर कात्रे यांनी माहिती दिली ते लागलीच घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आजबाजुला पाहणी करून चौकशी केली काही आढळून न आल्याने पोलिसांनी तिला कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार केले. सध्या ती आरोग्य केंद्रात भरती आहे .

चिमुकलीला जीवनदान दिले

देश पातळीवर बेटी बचाव यासाठी शर्ती चे प्रयत्न सुरू असुन विविध प्रकारच्या योजना मुलींच्या साठी लागु आहेत मात्र अजनही लोकांना ते समजत नाही पोटाच्या गोळ्याला रस्त्यावर टाकून देतात मात्र माणुसकी अजूनही जीवंत आहे दोन्ही पोलीस पाटील तात्काळ आल्या ने तिला जिवदान मिळाले.
 

जळगाव

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

US Election : अमेरिकेला मिळणार पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष? कमला हॅरिस यांच्या गावी विजयाची उत्कंठा

SCROLL FOR NEXT