जळगाव

वढोदा वनक्षेत्रालगत गावांमध्ये वाघ, बिबट्याचा मुक्त संचार; शेतकऱ्यांमध्ये भिती

गजानन खिरडकर

मुक्ताई नगर ः वढोदा जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या हिवरा आणि पारंबी शेतीशिवारात पट्टेदार वाघासह बिबट्याचा मुक्त संचार आढळून आल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये भिती चे वातावरण पसरले असून वनविभागाने या शिवारात कायम गस्त घालून बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

गेल्या दोन तीन दिवसांंपासून हिवरा पारंबी शेती शिवारात शेतकऱ्यांना शेतात जाताना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे हिवरा येथील भिका नामदेव माने या शेतकऱ्याने सोमवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतातून कामे आपटून येत असताना त्यांना पट्टेदार वाघ जातांना दिसला तर त्रंबक निनाजी मुळे रा.हिवरा यांच्या गट नंबर 60/1मध्ये वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले.  राजुरा रस्त्यावर पारंबीला रात्ररी स्ता ओलांडून जातांना बिबट्या बोरखेडा येथील तरूणांना दिसला. हिवरा सरपंच तथा वनसमितीचे अध्यक्ष शिवा पाटील, पारंबी चे शेतकरी निलेश भास्कर पाटील यांनी वनविभागाचे वनाधिकारी अमोल चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली.

वन कर्मचाऱयांनी केली पाहणी

वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, वनपाल डिगंबर पाचपांडे, वनरक्षक ज्ञानोबा धूळगंडे, राम आसुरे,आदि सह वन कर्मचारी यांनी शेती शिवारात गस्त घालून ज्यांना प्रत्यक्षदर्शी पट्टेदार वाघ दिसला त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच वाघाच्या पायाचे ठसे सुद्धा घेतले. 

शेतकरी, मजूरांमध्ये भिती

पारंबी येथे शेतात वाघ मुक्तसंचार करतांना शेतकरी व मजूरांना दिसत आहे. त्यामुळे शेतात काम करण्यास शेतकरी व मजूर घाबरलेले असूून भितीचे वातावरण आहे. त्यामुळे गावातील शेतकऱयांकडून वनविभागाच्या अधिकाऱयांना वाघाचा व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT