Vaccination Vaccination
जळगाव

नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला पाच लाखांचा टप्पा

Nandurbar Vaccination News : नंदुरबार तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील ३० हजार २७४ व्यक्तींनी पहिला डोस तर ६ हजार ९६१ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ रोजी पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथे लसीकरणाचा शुभारंभ झाला.

नंदुरबार: जिल्ह्यात कोरोना लसीचे (Corona Vaccine) पाच लाख डोस दिले आहेत. जिल्ह्यातील १४ लाख ९३ हजार ७२० लोकांना कोरोना लसीकरणाचे (Vaccination) उद्दिष्ट होते. त्यापैकी ४ लाख ११ हजार २७३ नागरिकांनी (२७.५३ टक्के) लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ९० हजार २६१ नागरिकांनी (६.०४) दोन्ही डोस घेतले आहे. लसींचे असे एकूण ५ लाख १ हजार ५३४ डोस दिले आहेत.

नंदुरबार तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील ३० हजार २७४ व्यक्तींनी पहिला डोस तर ६ हजार ९६१ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांवरील ६८ हजार ८६२ व्यक्तींनी पहिला तर २३ हजार १४० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ३ हजार ५१४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला आणि त्यांपैकी २ हजार ४८९ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. ९ हजार ४४४ कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर २ हजार ९५९ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तालुक्यात असे एकूण १ लाख ४७ हजार ६४३ डोस दिले आहेत. नवापूर तालुक्यात ९५ हजार ३२० व्यक्तींना डोस दिले आहेत. शहादा तालुक्यात १ लाख ३० हजार ३८२, तळोदा तालुक्यात ५४ हजार ७०३, अक्कलकुवा तालुक्यात ४३ हजार ७९९ व धडगाव तालुक्यात २९ हजार ६८७ डोस दिले आहेत.

प्रशासनाचे आवाहन..
जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ रोजी पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथे लसीकरणाचा शुभारंभ झाला. जिल्ह्याने २२ एप्रिल रोजी लसीकरणाचा एक लाखाचा, १२ मे रोजी दोन लाख, ९ जून रोजी तीन लाख, आणि १ जुलैला चार लाखांचा टप्पा पूर्ण केला. कोरोनापासून संरक्षणासाठी नागरिकांनी कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


जिल्ह्यातील एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी (पाहिला डोस) -१५ हजार ६१०
आरोग्य कर्मचारी (दुसरा डोस) -८ हजार ६११
कोरोना योद्धा कर्मचारी (पहिला डोस )- ४१ हजार २१८
कोरोना योद्धा कर्मचारी (दुसरा डोस )- १० हजार ७७९
१८ ते ४४ वयोगटातील (पहिला डोस )- १ लाख १ हजार ८०६
१८ ते ४४ वयोगटातील (दुसरा डोस )- ११ हजार ६६६
४५ वर्षावरील वयोगटातील (पहिला डोस )- २ लाख ५२ हजार ६३९
४५ वर्षावरील वयोगटातील (दुसरा डोस )- ५९ हजार २०५
नंदुरबार जिल्ह्यात एकूण लसीकरण : ५ लाख १ हजार ५३४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT