पाचोरा : अति पाऊस (Have Rain), नैसर्गिक आपत्ती (Natural disasters) अथवा पावसाअभावी शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी पिकाचे नुकसान (Crop Damage) होण्याचे सातत्य गेल्या काही वर्षापासून कायम आहे. अशा नुकसानीचे महसूल विभागाच्या (Revenue Department) वतीने पंचनामे होऊन भरपाईसाठी शासनाकडे अहवाल पाठवणे व शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या (Farmers) बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा करणे ही प्रक्रिया सातत्याने सुरूच असते. मिळणारी भरपाई झालेल्या नुकसानीच्या किती प्रमाणात असते व त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला कितपत दिलासा मिळतो हा कदाचित संशोधनाचा विषय ठरेल.
(farmers help compensation of only two hundred and seventy rupees received)
त्यामुळेच शासनाच्या या नुकसान भरपाईच्या विषयावर सातत्याने टीकेचा सूर उमटताना दिसतो .असाच काहीसा प्रकार खडकदेवळा( ता पाचोरा) येथील अरुण पाटील या शेतकऱ्या संदर्भात घडला असून गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून त्यांच्या खात्यात अवघे 270 रुपये जमा झाले आहेत. हा विषय सध्या तालुक्यात चांगलाच चर्चेत आला आहे.
अरुण पाटील यांची खडकदेवळा शिवारात शेती असून गेल्यावर्षी अति पावसामुळे हाताशी आलेले पीक व तोंडाशी आलेला घास नष्ट झाला. नेहमीप्रमाणे महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे केले.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा झाली. ही रक्कम अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचा सूरही कानी पडतो. परंतु अरुण पाटील यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईपोटी अवघे 270 रुपये जमा झाले आहेत .त्यामुळे संतप्त भावना व्यक्त होत असून अरुण पाटील यांनी याबाबत तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे लेखी पत्र देऊन नुकसान भरपाई रकमे संदर्भात चौकशी होऊन योग्य ती भरपाई व न्यायाची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.