पारोळा : कोरोनाच्या (Corona) भयावह परिस्थितीत महिलांनी कौटुंबिक (Family) जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळून कुटुंबाचे आरोग्यरक्षक म्हणून परिवाराला सेवा दिली. ताळेबंदी काळात आहाराची निगा राखली. या संकटकाळात ‘सकाळ- मैत्रीण’ने महिलांच्या सोबतीने कुटुंबाचा सेवायाग केला. आता पुन्हा महिलांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी किंबहुना त्यांना कुटुंबापलीकडे वेगळे काही करण्यासाठी ‘सकाळ’ (Sakal) समूहाने फूड ॲन्ड हेल्थ या संकल्पनेतून ‘सकाळ सुगरण’ स्पर्धेला सुरवात केली आहे. या स्पर्धेमुळे विविधांगी मेनूची ओळख व प्रत्यक्ष कृती करण्याची साधना उपलब्ध झाल्याने कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे. समाजात चांगली सुगरण म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी, महिलांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सुगरण स्पर्धा महिलांच्या विकासाचे उत्तम स्रोत ठरेल, असे प्रतिपादन टायगर किड्स प्राचार्य रुपाली पाटील यांनी केले.
पारोळ्यातील एकमेव इंग्लिश स्पिकींग शीतल ॲकॅडमीच्या माध्यमातून ‘सकाळ सुगरण’ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. शीतल ॲकॅडमीचे प्रमुख रवींद्र पाटील, जळगाव ‘सकाळ’च्या वितरण विभागाचे राकेश पाटील, पारोळा तालुका बातमीदार संजय पाटील, पूजा देवरे, रोहिणी कटेकर, दर्शना पाटील, दीपिका अमृतकर, योगिनी चौधरी, रुतूजा तांबट, दुर्गा क्षत्रिय, अपेक्षा मराठे, नंदा सोनवणे, नम्रता बेडिस्कर, हर्षदा पाटील उपस्थित होत्या.
राकेश पाटील यांनी ‘सकाळ- सुगरण’ स्पर्धेविषयी माहिती व कूपनविषयी मार्गदर्शन केले. रवींद्र पाटील यांनी ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांचे कौतुक करीत सुगरण स्पर्धा निश्चितच महिलांना अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्ध करण्यासाठी आधारवड ठरणारी स्पर्धा ठरेल, असे सांगितले. ‘सकाळ’च्या अंकातील विविध बातम्या या मन वेधणाऱ्या व गुणात्मकदृष्ट्या वस्तुनिष्ठ ठरणाऱ्या असून, वाचकांचा मोठा गोतावळा निर्माण झाल्याचे सिद्ध झाले असल्याचे पूजा देवरे यांनी सांगितले. दरम्यान, शीतल पाटील या कन्येने ‘सकाळ’च्या श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या सदराचे कौतुक करून ‘सकाळ ॲग्रोवन’ हा शेतकऱ्यांच्या मनाचा केंद्रबिंदू ठरल्याचे सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.