रावेर : जगातील एकमेव अपराजित योद्धा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत बाजीराव पेशवे (Shrimant Bajirao Peshwa Samadhi site) यांच्या मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रावेरखेडी (ता. सनावद, जि. खरगोन) येथील समाधी स्थळावर बुधवारी (ता. १८) त्यांची ३२१ वी जयंती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan) आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Minister Jyotiraditya Scindia) यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी होणार आहे.
मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि संस्कृतीमंत्री उषा ठाकूर, प्रभारी मंत्री कमल पटेल, खरगोनचे खासदार गजेंद्र पटेल, बाजीराव पेशवे यांचे वंशज आणि इतर सरदार घराण्यांचे वंशज यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून पुण्यातील प्रसिद्ध इतिहासकार, मोडी लिपीतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे उपस्थित राहतील. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी बाजीराव पेशवे स्मृती प्रतिष्ठानच्या दोन सदस्यांसह गेल्या महिन्यात गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.
त्यानंतर श्री. शहा यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी या कामासाठी चर्चा केली आणि या स्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. मध्य प्रदेश सरकारने या जागी २९ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्याचे निश्चित केले आहे. मुख्यमंत्री श्री. चौहान आणि केंद्रीय मंत्री श्री. सिंधिया यांच्या हस्ते येथे थोरल्या बाजीरावांच्या मोठ्या पुतळ्याचे बांधकाम, नर्मदा स्नानासाठी घाट, पर्यटकांसाठी खोली, फूड झोन, किर्तीस्तंभ, तसेच प्रकाश आणि साउंड शोसाठी थिएटरदेखील प्रस्तावित आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमंत बाजीराव पेशवा मेमोरियल फाउंडेशन, मध्य प्रदेशच्या माध्यमातून केले जात आहे. हे प्रतिष्ठान गेली २० वर्षे समाधीच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा पाठपुरावा करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.