Accident 
जळगाव

हसत खेळत घरातून निघालेल्या युवकांच्या मृत्यूने सुळे गावावर शोककळा

आठ वाहने एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात चारजण ठार तर दोन गंभीर जखमी झाले.

सचिन पाटील

शिरपूर : दिवाळीसाठी कपडे घेऊन येतो असे सांगून हसतखेळत घरातून निघालेल्या युवकांचे छिन्नविच्छिन्न मृतदेह (Accident Death) बघून नातलगांना शोक अनावर झाला. काहींना तर जागीच भोवळ आली. काही वेळातच आक्रोशाने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचा (Hospital) परिसर भरून गेला.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर 27 ऑक्टोबरला रात्री साडेआठला आठ वाहने एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात चारजण ठार तर दोन गंभीर जखमी झाले. मृत सचिन संपत गांगुर्डे, शिवा रामदास गांगुर्डे, राजू सीताराम गांगुर्डे व रामदास सोमनाथ दळवी कळवण तालुक्यातील सुळे पिंपळे येथील रहिवासी आहेत. घटनेचे वृत्त कळताच सुळे गावावर शोककळा पसरली. मृतांचे नातलग रात्री उशिरा शिरपुरात दाखल झाले.

भावंडे दगावली

मृत गांगुर्डे कुटुंबातील युवक  एकमेकांचे चुलतभाऊ आहेत. मृत रामदास दळवी शिवा गांगुर्डेचा मेव्हणा होता. शिवाचे वडील रामदास गांगुर्डे यांना एकुलता मुलगा आणि जावयाचे मृतदेह पाहून भोवळ आली. मृत राजूचा भाऊ धोंडीराम याने हंबरडा फोडला. त्यांचा शोक पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. त्यांच्यासोबत आलेले पोलिस पाटील पांडूरंग गांगुर्डे यांनी सांत्वन केले.

कपडे घेऊन येतांना अपघात

गांगुर्डे कुळांची बहुसंख्या असलेल्या सुळे पिंपळे गावात मृतांचे सर्वाधिक मोठे कुटुंब आहे. सर्वांना शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. त्यातील राजू गांगुर्डे याचे जयदर (ता.कळवण) येथे तयार कपडे विक्रीचे दुकान आहे. दिवाळीत माल भरण्यासाठी तो सेंधवा येथे जाण्यासाठी निघाला. शिक्षक असलेला चुलतभाऊ कांतीलाल गांगुर्डे याची मारुती बॅलेनो कार त्याने मागून घेतली. त्याच्यासोबत अन्य दोन चुलतभाऊ व मेव्हणेही निघाले. कपड्यांचे नमुने घेऊन परत येत असतांना झालेल्या भीषण अपघातात चौघेही ठार झाले.

कर्त्या युवकांचा मृत्यू

मृत सचिन पुणे येथे पदवीच्या द्वितीय वर्षात तर शिवा पदव्युत्तर शिक्षण घेत होता. दोघेही कुटुंबात एकुलते होते. रामदास दळवी शेतकरी होते. राजूचा नुकताच जून महिन्यात विवाह झाला होता. एकाच अपघातात चार कर्त्या युवकांचा मृत्यू झाल्याने सुळे पिंपळे गावावर शोकसावट पसरले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह घेऊन नातलग गावी रवाना झाले. तहसीलदार आबा महाजन, सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी औपचारिक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देऊन सहकार्य केले.

अपघातानंतर तर्कवितर्क

काही सेकंदात तीन कार आणि पाच ट्रक एकमेकांना धडकल्याने हा अपघात नेमका कोणामुळे झाला असावा याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. अपघातस्थळ निर्जन असल्यामुळे व उतारावर वेग नियंत्रणाच्या प्रयत्नात चालक गुंतल्यामुळे अपघात कसा घडला याबाबतही कोणी ठोस माहिती दिली नाही. मात्र उतारावरुन खाली येतांना ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले असावे व त्याच ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बॅलेनो दोन ट्रक्सच्या मध्ये चेपली गेली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT