Medical Hub Medical Hub
जळगाव

सरकारच्या अनास्थेने ‘मेडिकल हब’चे काम थंड बस्त्यात

Jalgaon Medical Hub News :२०१७ मध्ये ‘हब’ मंजूर झाले, त्या वेळी प्रारंभिक टप्प्यात सातशे कोटींची तरतूदही त्यासाठी करण्यात आली.

सचिन जोशी


जळगाव :
फडणवीस सरकारच्या (Devendra Fadnavis Government) कार्यकाळात जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरणारे ‘मेडिकल हब’ (Medical Hub) मंजूर झाले. सामान्य रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयही (Medical college in general hospital) सुरू झाले. टप्प्याटप्प्याने ‘हब’ साकारण्याची अपेक्षा असताना गेल्या दोन वर्षांत सरकारची अनास्था व कोरोनाच्या अडथळ्याने त्यासाठी निधीची तरतूदच न झाल्याने काम रखडले आहे.
वैद्यकीय शिक्षणातील विविध शाखांचे एकाच छताखाली शिक्षण मिळू शकेल आणि सोबतच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची (Multispeciality Hospital) सुविधा म्हणून जळगाव जिल्ह्यासाठी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात २०१७ मध्ये ‘मेडिकल हब’ मंजूर करण्यात आले. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी त्यांचे राजकीय वजन वापरून अशा प्रकारचा देशातील एकमेव प्रकल्प जिल्ह्यासाठी अक्षरश: खेचून आणला.

(work on the stat governments apathetic jalgaon medical hub has stalled)

पहिले शासकीय ‘होमिओपॅथी’
‘मेडिकल हब’अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद, दंतचिकित्सा (डेंटल), नर्सिंग, फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी अशा विविध शाखांच्या अभ्यासक्रमाची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. होमिओपॅथीचे पहिले शासकीय महाविद्यालय म्हणून या ‘हब’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.


दोन वर्षांपूर्वी उद्‌घाटन
२०१७ मध्ये ‘हब’ मंजूर झाले, त्या वेळी प्रारंभिक टप्प्यात सातशे कोटींची तरतूदही त्यासाठी करण्यात आली. वैद्यकीय अभ्यासक्रमाची बॅच सुरू झाली. टप्प्याटप्प्याने अन्य शाखा व सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित होते. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ‘हब’चे उद्‌घाटन झाले.


चिंचोली शिवारात मोठी जागा
तत्कालीन सरकारने या भव्य प्रकल्पासाठी ६७ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही जागा अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या नावानेही झाली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत या प्रकल्पासाठी आघाडी सरकारने निधी देणे तर दूरच, पण ‘छदाम’चीही तरतूद केली नाही, त्यामुळे देशात एकमेव उभ्या राहू पाहत असलेल्या ‘हब’चे काम रखडले आहे.


एकाच छताखाली वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विविध विद्याशाखांची संस्था म्हणून ‘मेडिकल हब’ जिल्ह्यासाठी मंजूर केले. सरकारने त्यासाठी जागाही दिली, निधीची तरतूद करून निविदाप्रक्रियाही जवळपास पूर्ण केली होती. मात्र, नंतर सरकार बदलले. आघाडी सरकारमध्ये कुठल्याही प्रकारची निर्णयक्षमताच नसल्याने ‘हब’चे काम दोन वर्षांपासून ठप्प आहे.
-गिरीश महाजन, माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT