यावल : तालुक्यातील दगडी येथील पिता-पुत्रांनी आज सकाळी दहा वाजता एक व्हिडिओ (Vidio) तयार केला. आणि त्या व्हिडिओमध्ये एकाच्या हातामध्ये रायफल (Rifle) तर दुसऱ्याच्या हातामध्ये तलवार (Sword) दिसते. सहज गंमत म्हणून तयार केलेला तो व्हिडिओ बघता बघता दोन तासांमध्ये इतका व्हायरल झाला, की थेट यावल पोलीस ठाण्यापर्यंत येऊन पोहोचला. व दोन तासांमध्ये व्हिडिओ बनवणाऱ्या पिता-पुत्रांना पोलिसांनी ताब्यात घेत, त्यांच्याविरुद्ध आर्म अॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील दगडी या गावात अशोक हिरामण मोरे (वय३५), व त्याचे वडील हिरामण मोतीराम मोरे (वय ५५) या पिता पुत्रांनी एकाच्या हातात रायफल, तर दुसऱ्याच्या हातात तलवार घेऊन एक व्हिडिओ बनवला. सहज गंमत म्हणून हा व्हिडिओ त्यांनी तयार केला. आणि तो त्यांनी सोशल नेटवर्कवर टाकला. बघता बघता दोन तासांमध्ये हा व्हिडीओ इतका प्रचंड व्हायरल झाला, की काही जणांनी थेट यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांच्याकडे तो पाठवला. या व्हिडिओची पडताळणी केली असता हे पिता-पुत्र दोघं समोर आले.
पोलिसांची तत्काळ अॅक्शन..
पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस हवालदार संजय देवरे, निलेश वाघ ,भूषण चव्हाण, योगेश खडके या पथकाने तातडीने दगडी गाव गाठले व त्यांनी अशोक हिरामण मोरे, व हिरामण मोतीराम मोरे या दोघं पिता-पुत्रांना रायफल आणि तलवार सह ताब्यात घेतले .या दोघांच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून आर्म अॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच आपण सोशल नेटवर्कवर कोणताही व्हिडिओ टाकत असताना आपल्या हातून एखादी चूक तर होत नाही ना याची काळजी करणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.