corona vaccination 
जळगाव

राजोरा गावात शंभर टक्के लसिकरण; जळगाव जिल्ह्यातील पहिले गाव

राजोरा गावातील आणी परिसरातील नागरीकांनी कोवीड लसीकरण मोहीमेत १०० टक्के सहकार्य केले.

राजू कवडीवाले

यावल: तालुक्यातील राजोरा हे गाव कोवीड-१९ (Covid-19) च्या पार्श्वभूमीवर १०० टक्के लसीकरण (Vaccination) करणारे जळगाव जिल्ह्यातील पहीले गाव ठरले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील यांनी राजोरा गावास भेट देऊन प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या (Primary Health Center) स्थानिक आरोग्य पथकाचे कौत्तुक केले आहे. दरम्यान मागील दिड वर्षापासून संपुर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणु संसर्गाने (Corona virus infection) थैमान घातले असुन, या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांची कुटुंब उद्धवस्थ झालीत. कोरोना संपुष्टात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न झालीत.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातुन अत्यंत वेगाने लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवुन उल्लेखनिय कार्य केले. यावल तालुक्यातील भालोद प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत येणारे राजोरा उपकेन्द्राने गाव आणी परिसरात नागरीकांनी कोवीड लसीकरण मोहीमेत १०० टक्के लसीकरणाचे कार्य केले. यात पहीले कोविडशिल्ड लसीकरण कार्यक्रम ८ एप्रिल २०२१ला १८ ते ४४ वर्षाच्या वयोगटातील १९९, २३ एप्रिलला ४५ते ५९ वर्ष वयोगटाच्या १८४ नागरीकांना, त्याचप्रमाणे ६० वर्ष वयोगटातील २०२ जणांना तर गरोदरमातांना १० ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत, असे सर्व वयोगटातील ५८५ पैक्की ५८५ नागरीकांनी लसीकरण घेतले असुन ८९५ लसीकरण डोस देण्यात आले. तर १५ ऑगस्टला राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेत दुसरे लसीकरण ५५० नागरीकांनी घेतले. लसीकरणच्या राष्ट्रीय आरोग्य मोहीमेत उत्कृष्ट कार्य करणारे राजोरा हे जळगाव जिल्ह्यातील पहीले गाव ठरले आहे.

लसिकरणासाठी यांनी घेतली मेहनत

या आरोग्य सेवेच्या उत्कृष्ठ कार्यासाठी भालोद प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिक्षा सुरुशे, डॉ. प्राजक्ता चौहान, डॉ. राहुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राजोरा उपकेन्द्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. जाकीर हुसैन पिंजारी, आरोग्य सहाय्यक राजेन्द्र पालवे, आरोग्य सेविका श्रीमती के.आर. बोरोले, श्रीमती एस. एस. पाटील, वैशाली महाजन, आरोग्य सेवक अलताफ देशपांडे त्याचप्रमाणे आशा कार्यकर्ता मनिषा महाजन, मंगला सोनवणे, आशा पाटील , ज्योती ठाकरे, हेमलता नारखेडे, किरण नेहते, हर्षल सोनवणे यांनी महत्वाची कामगिरी बजावली.

जि.प अध्यक्षांची गावाला भेट

दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजनाताई पाटील यांनी या ठीकाणी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी.जमादार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिप अध्यक्षांनी गावकऱ्यांचे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामांचे कौतूक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT