यावल : तालुक्यातील मनवेल येथील अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट प्रतीचे जेवण मिळत असल्याच्या निषेधार्थ शाळेतील ३१ विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर पायी मोर्चा काढला.
आवर्जून वाचा- जळगावमध्ये शाळा बंदबाबत आज होणार निर्णय
मनवेल येथे उज्ज्वल शिक्षण संस्था संचलित आश्रमशाळा असून, शाळेत प्राथमिक व माध्यमिकचे मिळून पाचशे विद्यार्थी आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवी ते दहावीची मुले व मुली मिळून पन्नास विद्यार्थी शाळेत आहेत. रविवार असल्याने शाळेवर शिक्षकही उपस्थित नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा होता.
अखेर विद्यार्थी पायीच निघाले...
निकृष्ट जेवणाबाबत तक्रार करूनही उपयोग न झाल्यामुळे अखेरीस आठवी ते दहावीच्या ३१ विद्यार्थ्यांनी सायंकाळी सहाला मनवेल येथून निघून १३ किलोमीटर अंतर पायी चालत आदिवासी कार्यालय रात्री साडेआठला गाठले. रात्री उशिरापर्यंत सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन. बी. झंपरवार यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजूत घेतल्या. या वेळी विकास पाटील, शाळेचे मुख्याध्यापक विकास अलोने उपस्थित होते.
आवश्य वाचा- सीसीआय, पणनकडून १४ लाख क्विंटल कापूस खरेदी
वसतिगृह अधीक्षकाची कानउघाडणी
सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन. बी. झंपरवार यांनी संतप्त विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेत निकृष्ट जेवण दिल्याबद्दल वसतिगृह अधीक्षक वसंत पाटील यांची चांगलीच कानउघाडणी करून विद्यार्थ्यांची समजूत काढली.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.