Girish Mahajan and Gulab Patil esakal
जळगाव

Market Committee Election : भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांची उद्या बैठक; युतीबाबत निर्णय?

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील १२ समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे.

यात स्थानिक स्तरावर युतीबाबत भाजप (BJP) व शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) नेत्यांची संयुक्त बैठक रविवारी (ता. २६) होणार आहे. (market committee election joint meeting of BJP and Shiv Sena Shinde group leaders will be held on 26 march for alliance at local level jalgaon news)

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) , भाजप नेते व राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) , माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील व दोन्ही पक्षांचे जिल्ह्यातील नेते उपस्थित राहतील.

यासंदर्भात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली असून, निवडणूक लढविण्यासंदर्भात दोन्ही पक्षांची तयारी आहे. मात्र, आता युतीबाबत निर्णय होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांची निवडणूक २८ व ३० एप्रिलला होणार आहे.

अर्ज भरण्यास २७ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. त्या पाश्‍र्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची बैठक माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच झाली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

शिवसेना शिंदे गटाची बैठक

शिवसेना शिंदे गटाची बैठक गुरुवारी (ता. २३) कानळदा रोडवरील लक्ष्मी जिनिंगमध्ये झाली. बैठकीला जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, पवन सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील बाजार समित्यांची निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

"जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. शिवसेना (शिंदे गट) व भाजपची राज्यात युती आहे. बाजार समित्यांच्या निवडणुकीत स्थानिक स्तरावर युती करण्याबाबत नेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे." -नीलेश पाटील, जिल्हाप्रमुख शिवसेना (शिंदे गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT