Jalgaon Market Committee election esakal
जळगाव

Market Committee Election : बाजार समितीसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; 7 केंद्रांवर मतदान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जी. एस. हायस्कूल येथे शुक्रवारी (ता.२८) सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होणार आहे. (Market Committee Election Polling at seven centres today 28 april jalgaon news)

सोळा जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात असून, महाविकास आघाडीचे सहकार पॅनल, भाजप पुरस्कृत आपले शेतकरी विकास पॅनल तर गावरान जागल्या संघटना व आप पुरस्कृत शेतकरी शोषणमुक्ती पॅनलमध्ये तिरंगी लढत होत आहे.

जी. एस. हायस्कूल येथील एकूण सात केंद्रांवर मतदान होणार असून, मतदान केंद्र १ ते ३ सोसायटी मतदारसंघ, मतदान केंद्र ४ ते ६ वर ग्रामपंचायत मतदारसंघ तर मतदान केंद्र ७ वर हमाल मापाडी मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आजी, माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, तालुक्याच्या भविष्याच्या राजकारणावर परिणाम करणारी ही निवडणूक ठरणार आहे.

आमदार अनिल पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी तर माजी आमदार शिरीष चौधरी, स्मिता वाघ व डॉ. बी. एस. पाटील यांच्या नेतृत्वात आपले शेतकरी विकास पॅनल निवडणुकीत उतरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT