Fire News esakal
जळगाव

Jalgaon Fire News : मारवडला आगीत 7 लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मारवड (ता. अमळनेर) ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलातील भाडे तत्वावर असलेले राजेंद्र भगवान पाटील यांचे शिव जनरल ॲन्ड किराणा दुकानास रविवारी (ता. ११) पहाटे अचानक आग लागली. दुकानातील सर्व साहित्य जळून सुमारे सात लाखांचे नुकसान झाले आहे.

दुकानमालक राजेंद्र पाटील पहाटे लघुशंकेला उठले असता, त्यांना दुकानातून मोठा धूर निघताना दिसला.

आरडाओरड केली असता, दुकानाजवळ दिनेश नारायण साळुंखे, शरद नामदेव कुंभार, गोकुळ केशव पाटील, रवींद्र यादवराव पाटील, कैलास जगन्नाथ पाटील, प्रकाश राजाराम चौधरी, अनिल साहेबराव पाटील तेथे आले. किराणा दुकानाचे शटर उघडले असता, दुकानास आग लागली होती. (Marwar is on fire 7 lakhs loss Jalgaon Fire News)

बादलीने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. दिनेश साळुंखे यांनी पोलिस ठाण्यात जाऊन अमळनेर येथून अग्निशमन दलास पाचारण केले. मात्र, तोवर दुकान पूर्णपणे खाक झाले होते.

राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून झेरॉक्स मशीन, डीफ फ्रीज, स्टेशनरी साहित्य, तसेच किराणा साहित्य व रोख रक्कम आदी मिळून सुमारे सात लाखांचे नुकसान झाले.

इलेक्ट्रीक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील, हवालदार अगोने, तलाठी भावसार आदींनी पाहणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सर्व खाजगी मालमत्ता ही भौतिक संसाधने नाहीत, सरकार अधिग्रहण करु शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार? मुंबई इंडियन्सच नव्हे, तर चार तगडे संघ बोली लावणार

Nashik Vidhan Sabha Election: विधानसभेत महायुतीला 175 जागा मिळणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत माहिती

Diwali Weekend Hotel Spike : शहर निघाले हॉटेलिंगला..! चार दिवसांत ३ ते ४ कोटींची उलाढाल, सुट्यांमध्ये गाठणार ९ कोटींचा टप्पा

Heena Gavit : भाजपला विधानसभेच्या तोंडावर मोठा झटका! माजी खासदाराचा पक्षाला रामराम; विधानसभेच्या मैदानात अपक्ष लढणार

SCROLL FOR NEXT