crime news  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भुसावळमधून पानमसाल्यासह हुक्का पॉर्लरचे साहित्य जप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पानमसाला, गुटखा, प्रतिबंधित खाद्यपदार्थ व हुक्का पॉर्लर साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता. ९) भुसावळ शहरात विविध ठिकाणी छापे टाकले. (Materials of hookah parlour along with pan masala seized from Bhusawal jalgaon crime news)

या कारवाईत एकूण चार लाख ५१ हजार ८२४ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे. वसंत टॉकीजनजीक असलेले गायत्री पानमंदिर येथून पानमसाला, गुटखा विक्री करणारे प्रकाश परमानंद जोशी, प्रदीप परमानंद जोशी (दोघे रा. प्रभाकर कॉलनी, भुसावळ) यांच्या ताब्यातून, दुकानातून व राहत्या घरातून चोरटी विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेला चार लाख ३० हजार ४७५ रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला, हुक्का पॉर्लर साहित्य जप्त करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार युनूस शेख, सुनील दामोदरे, दीपक पाटील, पोलिस नाईक रणजित जाधव, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, पोलिस नाईक किरण भावसार, प्रमोद लाडवंजारी, चालक प्रमोद ठाकूर, अमोल करडईकर यांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केल्याने खळबळ उडाली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

याशिवाय सरदार वल्लभभाई पटेल मार्केटमधील पान सेंटर येथे देखील छापा टाकण्यात आला. येथील पान दुकानदार पीयूष प्रदीप जोशी (रा. प्रभाकर कॉलनी, भुसावळ) यांच्या ताब्यातून २१ हजार ३४९ रुपये किमतीचा पानमसाला जप्त करण्यात आला आहे. एकूण चार लाख ५१ हजार ८२४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT