World Mental Health Day 2023 sakal
जळगाव

World Mental Health Day: 100 मागे 30 जण मानसिक आजारी; जिल्ह्यात वर्षभरात 20 हजार जणांवर मानसिक उपचार

सकाळ वृत्तसेवा

World Mental Health Day : धकाधकीची जीवनशैली, फास्ट फुड, सतत मोबाइल पाहणे, व्यायाम व खेळाचा अभाव, आवडते छंद न जोपासणे यामुळे मुलांसह मोठ्या व्यक्तींना मानसिक आजार जडत आहेत. शंभर व्यक्तींमागे तीस व्यक्तींना या आजाराची लागण झाली आहे. यावर उपाय म्हणजे आवडते छंद जोपासणे, मानसिक संतूलन राखणे होय.

जिल्हा रुग्णालयातर्फे वर्षभरात १८ ते २० हजार जणांना मानसिक समुपदेशन, औषधोपचार केले जात आहे. यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य टिकवून आहे. अशा पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. १०) जागतिक मानसिक आरोग्य दिन पाळला जात आहे. (Mental treatment of 20 thousand people in district in year World Mental Health Day jalgaon news)

मानसिक आरोग्य म्हणजे काय?

मानसिक आरोग्यात आपले भावनिक, मानसिक, सामाजिक कल्याण समाविष्ट आहे. आपण कसे विचार करतो, अनुभवतो आणि कसे वागतो यावर त्याचा परिणाम होतो. तसेच, आपण तणाव कसे हाताळतो, इतरांशी कसे संबंध ठेवतो आणि निरोगी निवडी करतो हे निर्धारित करण्यातदेखील मदत करते ते म्हणजे मानसिक आरोग्य.

ही आहेत लक्षणे..

* विचारांत गोंधळ असणे

* उदास किंवा निराश वाटणे

* जास्त भीती किंवा काळजी

* अपराधीपणाची तीव्र भावना

* लक्षणीय थकवा, झोपेची समस्या

* वास्तवापासून अलिप्तता (भ्रम)

* दैनंदिन समस्या, तणावाचा सामना करण्यास असमर्थता

* परिस्थिती, लोकांना समजून घेण्यात अपयश

* अल्कोहोल, मादक पदार्थांच्या आहारी जाणे

* जास्त राग, शत्रुत्व, हिंसा

* आत्मघातकी विचार येणे

हे आहेत उपाय..

* आवडते छंद जोपासा

* इतरांकडून अवाजवी अपेक्षा बाळगू नका

* पालकांनी मुलांवर अपेक्षाचे ओझे लादू नका

* यश, अपयशाकडे खेळाडू वृत्तीने पहा

* आपले मन सतत मोकळे करा

मानसिकरित्या चांगले असण्याची लक्षणे

* आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे ते ठरविणे

* मनावर ताबा असणे

* माणसाचे मन शांत असते

* इतरांबरोबर जुळवून घेता येते

* कोणी नावे ठेवली, कोणी उणीदुणी केली, तरीही दुखावले न जाणे

* आपल्या प्रश्‍नांना आपणच उत्तर शोधणे.

* जीवनातले ताण-तणाव, काळजी सहन करण्याची क्षमता असणे.

"मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी आपले आवडते छंद जोपासा. मैदानी खेळ खेळा. आवडते संगीत ऐका. कुटुंबासोबत संवाद वाढविणे, वाचन, लेखनाने मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. मनात वाईट विचार येत असल्यास मोफत मदतीसाठी १४४१६ यावर कॉल करा." -दौलत निमसे पाटील, मानसशास्त्र चिकीत्सक जिल्हा रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT