After coming home, Johar Tadvi sitting with his wife Salima family, children and their parents standing. esakal
जळगाव

Jalgaon News : रावेर तालुक्यातील गतिमंद विवाहिता अडीच वर्षानंतर सापडली तामिळनाडूत; कुटुंबात आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सुमारे अडीच वर्षांपासून जानोरी (ता. रावेर) येथील गतिमंद असलेली विवाहिता १७०० किलोमीटर अंतरावरील तमिळनाडू राज्यात सापडली असून, पतीने तिला नुकतेच घरी आणल्याने विवाहितेच्या दोन्ही मुलांनी आणि कुटुंबाने आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यानच्या काळात आणखी एक विवाह केलेल्या या पतीने आता दोन्ही पत्नीसह संसार करण्याचा निर्णय घेतला असून तामिळनाडूच्या रुग्णालयातील दयाळू नर्समुळेच पत्नी परत घरी आल्याची भावना पतीने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील जानोरी या छोट्याशा गावात जोहर तडवी हे आदिवासी समाजाचे कार्यकर्ते व तेथील विद्यमान सरपंच राहतात. (mentally retarded married woman from Raver taluka was found in Tamil Nadu jalgaon news)

त्यांची पत्नी सलिमा जोहर तडवी (वय ३०) ही अशिक्षित आणि गतिमंद आहे. गतिमंद असल्याने तिच्यावर जळगाव, अकोला, मुंबई येथे औषधोपचार सुरू होता. मे २०२१ मध्ये ती तालुक्यातील केऱ्हाळा येथील आपल्या माहेरी गेली असता तेथून बेपत्ता झाली. तडवी परिवाराने तिचा आजूबाजूला बराच शोध घेतला. मात्र ती आढळून न आल्याने २१ मे २०२१ ला ती हरविली असल्याची नोंद रावेर पोलिस ठाण्यात केली.

ही गतिमंद सलिमा रेल्वेने प्रवास करत तमिळनाडूत पोचली. तेथील पुदुकोट्टाई हे जिल्ह्याचे गाव असलेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तिला काही जणांनी भरती केले. दीर्घकाळ उपचार झाल्यावर देखील सुरुवातीला तिला आपले नाव, गाव किंवा पत्ता सांगता येत नव्हता. तसेच तेथील तामिळ भाषा तिला समजत नव्हती.

तिची मोडकी तोडकी मराठी भाषा तिथल्या लोकांना समजत नव्हती. त्याच रुग्णालयात नर्स असलेल्या राजस्थानमधील रहिवासी अंजली मारवाडी यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आत्मीयतेने आणि प्रेमाने तिच्याशी बहिणीप्रमाणे संवाद साधला. सलिमाला तिचे उपचार होत असलेल्या डॉ. सुजय पाटील, अकोला यांचे नाव तेवढे आठवत होते. अंजली मारवाडी यांनी तिच्या फोटोसह फेसबुकवर हिंदीत ती तामिळनाडूमध्ये सुरक्षित असल्याची माहिती प्रसारित केली.

तेथून समाज प्रसार माध्यमाचा वापर करणाऱ्यांनी व्हॉट्सअपवर माहिती प्रसारित केली आणि ही माहिती कुटुंबापर्यंत पोहोचली.

दरम्यानच्या काळात दुसरा विवाह केलेल्या पती जोहर तडवी यांनी तडक रावेर पोलिस ठाणे गाठून ती हरवली असल्याची अधिकृत नोंद पोलिस ठाण्यातून घेतली आणि खासगी गाडीने आपले मित्र दगडू तडवी यांच्यासह तामिळनाडू गाठले. औपचारिक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांनी आपल्या पत्नीला घरी आणले. तिथे दयाळू नर्स अंजली मारवाडी यांना भेटून कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान, मधल्या अडीच वर्षांच्या काळात जोहर तडवी यांनी त्यांचेच जवळचे मित्र असलेल्या सामाजिक कार्यकर्ते दगडू तडवी यांच्या नात्यातील स्त्रीशी विवाह केला होता. सलिमा आणि जोहर यांना दोन मुले आहेत. एक अकरावीत आणि दुसरा बारावीत शिक्षण घेत आहे. अडीच वर्षांनंतर आई घरी आलेली पाहून दोन्ही मुलांना, पतीला आणि सासू सासऱ्यांना आनंद झाला आहे.

यापुढे दोन्ही पत्नीसह सोबत जीवन व्यतीत करण्याचा निर्णय जोहर तडवी यांनी घेतला आहे. या कामी रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पोलिस उपनिरीक्षक दीपाली पाटील आणि सुनील वंजारी यांनी सलिमा तडवी यांना घरी परत आणण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT