Nobel Science Talent Search Exam esakal
जळगाव

Jalgaon News : नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेद्वारे गुणवंत विद्यार्थी जाणार इस्रोला; येथे करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मुलांच्या उन्हाळी सुट्या सुरू होत आहेत, अशातच विद्यार्थी व पालकांसाठी सुखद बातमी आहे. ५० हून अधिक विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला, तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभ्यास सहलीला जाण्याची संधी जळगावच्या नोबेल फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे. (Meritorious 50 students will go to ISRO through the Nobel Science Talent Search exam jalgaon news)

याअंतर्गत दिव्यांग प्रज्ञाचक्षू, तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना विशेष राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. या प्रकल्पासाठी भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाउंडेशन, मनोबल फाउंडेशन यांचे सहकार्य लाभत आहे.

विज्ञान व संशोधन क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी नोबेल फाउंडेशन ही संस्था कार्यरत आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो), आयआयटी, आयआयएम यांसारख्या उच्चशिक्षण संस्था अनुभवता याव्यात, तसेच विज्ञान व गणित या विषयाचा पाया पक्का व्हावा, यासाठी नोबेल फाउंडेशनतर्फे ‘नोबेल सायन्स टॅलेंट सर्च’ परीक्षेचे आयोजन दर वर्षी करण्यात येते.

आतापर्यंत ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत इस्रो, आयआयटी येथे भेट दिलेली आहे. इंग्रजी व मराठी माध्यमाच्या सर्व बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षा ११ जूनला ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी nsts.nobelfoundation.co.in या संकेतस्थळावर नोंदणी कारायची आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

अर्ज करण्यासाठी २० मेपर्यंत अंतिम मुदत आहे. या परीक्षेत गुणवत्तायादीमध्ये येणाऱ्या प्रथम पन्नास विद्यार्थ्यांना निःशुल्क इस्रो, आयआयटी आयआयएम, सायन्स सिटी, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, इंडियन प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूट येथे अभ्यास सहलीला नेण्यात येणार आहे. गुणवत्तायादीतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी निवडण्यात येईल. या विद्यार्थ्यांना करिअरच्या संदर्भात उन्हाळी व हिवाळी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.

तसेच अवकाशविषयक पुस्तके भेट दिली जाणार आहेत. परीक्षेसाठी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी, बारावी डिप्लोमा, असे तीन गट करण्यात आले आहेत. तिन्ही गटांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असून, परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहे. अधिक माहितीसाठी नोबेल फाउंडेशन आयएमआर कॉलेजजवळ (जळगाव) ७२१८५०१४४४, ७८७५४७९८७८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

"महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. या विद्यार्थ्यांना शालेय वयापासून जर संशोधनाची गोडी लागली तर महाराष्ट्रातून नोबेलविजेते शास्त्रज्ञ घडतील, यासाठी सामूहिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणून नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित करीत आहोत. जेणेकरून गोरगरिबांच्या मजुरांच्या मुलांनासुद्धा इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्था अभ्यासायला मिळतील." - जयदीप पाटील, संस्थापक, नोबेल फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT