जळगाव : ‘तुम्ही शिंदे गटात या, अन्यथा जळगावचा विकास रोखण्यात येईल’, असा मेसेज जळगावच्या महापौर जयश्री महाजन (Jalgaon Mayor Jayashree mahajan) यांना पाठविण्यात आला आहे. एका नगरसेवकाच्या माध्यमातून हा मेसेज टाकण्यात आला असल्याचे महापौर श्रीमती महाजन यांनी सांगितले. (message from corporate to Jalgaon mayor to join Shinde group jalgaon Latest Marathi News)
राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार चुरस सुरू आहे. शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश करून घेण्यात येत आहेत. जळगावातही काही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.
आज जिल्ह्यातील युवा सेनेच्या पदाधिकारी व महापालिकेतील काही नगरसेवकांनी माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी जळगावात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी म्हटले आहे, की धमकी देऊन काही जणांचा प्रवेश केला जात आहे.
महापौर जयश्री महाजन यांनाही शिंदे गटाच्या एका नगरसेवकाच्या माध्यमातून मोबाईलवर मेसेज टाकून धमकी आली आहे. ‘तुम्ही शिंदे गटात या, अन्यथा जळगावचा विकास रोखण्यात येईल’, असेही त्यांनी म्हटले आहे. अशा धमक्यांना आम्ही कोणत्याही प्रकारे भीक घालत नाही, असेही सावंत यांनी म्हटले आहे.
याबाबत महापौर जयश्री महाजन यांनीही पत्रकारांशी बोलताना सांगितले, की शिवसेना सोडून तुम्ही शिंदे गटात सहभागी झालात तर जळगावचा विकास होईल, अन्यथा जळगावचा विकास रोखण्यात येईल, असे मेसेज आपणास मोबाईलवर येत आहेत.
महापालिकेत काही नगरसेवक दुसऱ्या गटाला भेटलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मेसेज आले आहेत. आपण जर शिवसेना सोडून शिंदे गटात आले तर जळगाव शहराचा विकास अजून चांगल्या पद्धतीने होईल.
नाहीतर जळगाव शहराचा विकास थांबविला जाईल, कुठे तरी अडचणी निर्माण करण्यात येतील, अशा प्रकारचे मेसेज मला येत असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.