Jalgaon MGNREGA News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) कामावर कार्यरत मजुरांच्या प्रतिदिवस मजुरीत १७ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता मजुरांना प्रतिदिवस २५६ ऐवजी २७३ रुपये मिळणार आहेत. ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. (MGNREGA labourers will now get Rs 273 jalgaon news)
गेल्या काही दिवसांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजुरीत केलेल्या वाढीमुळे या योजनेतून रोजगार मिळविणाऱ्या सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बेरोजगारांच्या हाताला काम देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेत ५० टक्के कामे इतर यंत्रणांच्या माध्यमातून केली जातात. या योजनेचा केंद्रबिंदू ग्रामीण परिसर असल्यामुळे कामांचे नियोजन, देखरेख व सनियंत्रणाचे काम ग्रामपंचायतीकडे सोपविले आहे.
ग्रामसेवकाच्या मदतीसाठी ग्रामसभेत रोजगारसेवकाची निवड करण्यात आली आहे. या योजनेतून सर्वसामान्य आणि गरजवंतांना वर्षभरातील किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध झाला असून, त्यातून त्यांचे जगणे सुसह्य झाले आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
सध्या महागाई वाढली आहे. त्यातून २५६ रुपये प्रतिदिवस मजुरीत मजुरांना काम करणे परवडेनासे झाले आहे. त्याची दखल घेऊन केंद्र शासनाने १ एप्रिल २०२३ पासून रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत प्रतिदिवस १७ रुपयांनी वाढ केली आहे.
त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांवर कामे करणाऱ्या मजुरांना आता २५६ रुपयांऐवजी २७३ रुपये प्रतिदिवस मजुरी मिळणार आहे. त्यामुळे महागाईमध्ये मजुरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
नेटवर्कमुळे हजेरीत अडचणी
रोजगार हमी योजनेतील सार्वजनिक कामांवर काम करणाऱ्या मजुरांचे दिवसातून पहिल्या पाळीत हजेरी व दुसऱ्या पाळीत छायाचित्र काढून ते ॲपवर अपलोड करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे मजुराची कामे यंत्राद्वारे करण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे.
मात्र, ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये नेटवर्कची समस्या असते. त्यामुळे दिवसातून दोनवेळा हजेरी लावण्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता असून, त्यातून कामावर हजर मजुरांचीही गैरहजेरी लागण्याची समस्या निर्माण होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.