Mill Organic Farming Cluster Unmesh Patil in Lok Sabha jalgaon MP Unmesh Patil
जळगाव

‘गिरणा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर’साठी प्रयत्न; उन्मेष पाटील

उन्मेष पाटलांचा लोकसभेत मुद्दा; मंत्र्यांचे सकारात्मक उत्तर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर योजनेच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातही ‘गिरणा ऑरगॅनिक कॉरिडॉर’ची योजना जाहीर करुन त्यासाठी तरतूद करावी, अशी आग्रही मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी केली.संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्लीत सुरु असून या अधिवेशनात खासदार पाटील यांनी लोकसभेत याबाबत प्रश्‍न उपस्थित केला. गिरणा नदीतील प्रदूषण, नदीकाठच्या गावांची स्थिती, पर्यावरणासंबंधी माहिती देत ही मागणी गेली. लोकसभेच्या पटलावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गिरणा माईच्या शाश्वत विकासाचा प्रश्न मांडण्यात आल्याने गिरणा या भूमिकेचे स्वागत होत आहे.

गिरणा परिक्रमेतून प्रयत्न

खासदार उन्मेष दादा पाटील यांनी १ जानेवारीपासून गिरणा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत सुमारे ४०० किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे. या पदयात्रेत ते गावोगावी जाऊन शेतकऱ्यांची सुसंवाद साधला असून गिरणा काठाच्या शाश्वत विकासाची विकासासाठी सोबत काम करण्याचे आवाहन करत आहे.

सरकारचे वेधले लक्ष

याच अनुषंगाने उन्मेष पाटील यांनी ज्या पद्धतीने गंगा नदीच्या किनाऱ्यावरील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व गंगा नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी गंगा ऑर्गेनिक फार्मिंग क्लस्टर योजनेची घोषणा केली आहे त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी देखील मोठ्या प्रमाणात जलप्रदूषित झाली असून ‘गिरणा ऑरगॅनिक कॉरिडॉर (क्लस्टर)’ योजना राबविण्याची विनंती केली.

राज्य सरकारने प्रस्ताव द्यावा

या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी खासदार उन्मेष पाटील यांचे अभिनंदन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी जैविक शेती, परंपरागत कृषी विकास योजना या महात्वाकांक्षी योजना शासन राबवित असल्याचे म्हटले. गिरणा नदी ऑरगॅनिक कॉरिडॉरसाठी राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास या योजनेस मंजुरी देण्याची खात्री मंत्री कैलाश चौधरी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT