Jalgaon Anil Patil : कॅबिनेट मंत्रिपद मिळल्यानंतर प्रथमच मातृभूमीत पाय ठेवल्यानंतर अमळनेर तालुक्याचे भूमिपुत्र अनिल पाटील यांनी तालुक्यातील लोणे येथे शासकीय ताफ्यातून खाली उतरून भूमीवर डोके टेकवून नतमस्तक झाले. (Minister Anil Patil bowing at the gate after entering Amalner constituency jalgaon news)
मंत्री पाटील यांचे शुक्रवारी (ता. ७) सकाळी रेल्वेने जळगाव येथे आगमन झाल्यानंतर अजिंठा विश्रामगृहात थोडा वेळ थांबले.
त्यांनतर शासकीय ताफ्यासह अमळनेरकडे रवाना झाले. जळगाव, धरणगाव येथे स्वागत झाल्यानंतर अनिल पाटील अमळनेर तालुक्याच्या हद्दीत पोहचताच गाडीतून खाली उतरले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या वेळी ते भावनिक झाले होते. अमळनेर तालुका मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे, माजी नगरसेवक मुन्ना शर्मा, लोणे सरपंच भाईदास भिल यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनतर टाकरखेडा येथे स्वागतानंतर सती मातेचे दर्शन घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.