Minister Anil Patil statement about Padalse project completion jalgaon news 
जळगाव

Jalgaon News: पाडळसे प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही : मंत्री अनिल पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News: ‘लोकप्रतिनिधींचे रस्ते बंद करून प्रश्न सुटत नाही. प्रश्न हे चर्चेतून सुटत असतात. पाडळसेच्या संदर्भात सद्यःस्थितीत नियोजन विभागाची मंजुरी मिळाली असून प्रस्ताव वित्त विभागाकडे आहे, तिथून लवकरच मंजुरी मिळवून मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवला जाईल.

राज्य शासनाच्या मंजुरीनंतर ‘सीडब्लूसी’ची मान्यता घेतली जाईल, पाडळसे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केल्याशिवाय सोडणार नाही. कितीही अडचणी आल्या तरी त्या दूर केल्या जातील, असे आश्‍वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले. (Minister Anil Patil statement about Padalse project completion jalgaon news)

येथील मंगळग्रह मंदिरात पाडळसे प्रकल्प, साने गुरुजी उपसा व इतर सिंचन योजना, पांझरा- माळण नदीजोड प्रकल्प याबाबत चर्चा करण्यासाठी विशेष बैठक झाली. मंगळग्रह सेवा संस्थांनचे अध्यक्ष डिगंबर महाले अध्यक्षस्थानी होते.

माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, पाडळसे प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार पी. आर. पाटील, नागपूर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार, उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे कार्यवाह प्रा. विकास पाटील, पाडळसे जन आंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, प्रा. सुभाष पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या रिता बाविस्कर, नॅनो शास्त्रज्ञ डॉ. एल. ए. पाटील, अमळगावचे सरपंच गिरीश पाटील यांच्यासह पाडळसे धरण संघर्ष समितीचे पदाधिकारी, पातोंडा परिसर विकास मंच, मारवड विकास मंच तसेच रणाईचे विकास मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्मिता वाघ म्हणाल्या, की पाडळसे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व राजकीय व्यक्तींनी पक्षाचे जोडे बाहेर काढून एकत्रित येणे गरजेचे आहे. साहेबराव पाटील म्हणाले, की पाडळसे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मंत्री अनिल पाटील यांना पूर्ण वेळ द्यावा लागेल. त्याच्या पेक्षा कोणते महत्त्वाचे काम आहे? असा प्रश्न उपस्थित केला.

पाडळसे प्रकल्प हा २५ वर्षांपासून का पूर्ण होऊ दिला नाही. यात सत्यानाश कोणी केला याचा ही शोध लावला पाहिजे. १४ ‘टीएमसी’च्या या प्रकल्पाचे दोन टप्पे कशासाठी केले. पहिल्या टप्प्यात ९ टीएमसी अडविले जाणार आहे.

मग बाकीचे पाणी कोणी पळविले असा प्रश्न उपस्थित केला. पी. आर. पाटील म्हणाले, की ज्या पद्धतीने हतनूर धरणामुळे रावेर तालुका सुजलाम् सुफलाम् झाला त्या पद्धतीने पाडळसे पूर्ण झाल्यास विविध नद्यांमध्ये २०० किमीपर्यंत बॅक वॉटर थांबणार आहे.

सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यास कामाला गती मिळणार आहे. यावेळी ऋषीकेश गोसावी, हेमंत पाटील, प्रा. विकास पाटील, आर. बी. पाटील, प्रा. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, तिलोत्तमा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. इंजि. रंगराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन तर रणजित शिंदे यांनी आभार मानले.

पळवलेला निधीचा बॅकलॉग भरून काढा !

पाडळसे प्रकल्पात पूर्वी तांत्रिक अडचणी निर्माण करून काम थांबवले गेले. दीडशे कोटीचा हा प्रकल्प ४ हजार ८७१ कोटीपर्यंत पोहचला आहे. या धरणाचे काम रेंगाळले जात आहे. या प्रकल्पाचा निधी दुसरीकडे वळविला गेला आहे. यासाठी आता नागरिकांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे.

दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, पटत नसल्यास वेळप्रसंगी प्रकल्पाचे काम बंद पाडा. पळवलेला निधीचा अगोदर बॅकलॉग भरून काढा. मंत्री अनिल पाटील यांनी पुढाकार घेऊन हे काम कसे मार्गी लागेल याकडे लक्ष द्यावे, विनाकारण आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारायला लावू नये, अशी आर्त हाक राष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ तथा निवृत्त मुख्य अभियंता (सारथी) इंजि. अशोकराव पवार यांनी या बैठकीत दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबचा रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT