District Milk Union esakal
जळगाव

Jalgaon : जिल्हा दूध संघात लोणी साठ्याचा सव्वा कोटीचा गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा दूध संघात लोणी साठ्यात तब्बल सव्वा कोटीचा गैरव्यवहार आढळून आला आहे. या प्रकरणी दूध भुकटी व लोणी इन्चार्ज महेंद्र केदार व विक्री विभागप्रमुख अनंत अंबीकर यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याची माहिती चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा दूध संघात गैरव्यवहाराचे जे वृत्त बुधवारी (ता. १२) माध्यमात प्रसिद्ध झाले होते. त्याची वस्तुनिष्ठ माहिती देण्यासाठी आमदार एकनाथ खडसे व चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी खडसे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

या वेळी माहिती देताना चेअरमन खडसे यांनी सांगितले, की कोजागरी व दिवाळी सणानिमित्ताने आपण शुक्रवारी (ता. ७) कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्या समवेत प्रकल्पाला भेट देऊन संघात असलेल्या दूध व लोणी व दूध भुकटी याच्या साठ्याचा आढावा घेतला. श्री. लिमये यांना सर्व साठ्याची भौतिक तपासणी करण्याबाबत सूचना दिल्या.(Misappropriation of butter stock worth half a crore in district milk union jalgaon news)

...असा घडला प्रकार

कार्यकारी संचालकांनी एका टीमला शनिवारी (ता. ८) रात्री साडेनऊला दुग्धजन्य पदार्थांच्या साठ्याची भौतिक पडताळणी करण्याच्या सूचना दिल्यात. यात साठा रजिष्टर, रेकॉर्डमध्ये असलेला साठा व प्रत्यक्ष तपासणी केलेल्या साठ्यात तफावत आढळून आली. ती लपविण्यासाठी २ ऑक्टोबर २०२२ मध्ये रेकॉर्डमध्ये १४ टन गाय लोणीची गाडी वाई (जि. सातारा) येथील शीतगृहात डिस्पॅच केलेली आहे. याची किंमत साधारणतः ७० ते ८० लाख रुपये आहे. परंतु संघात असलेल्या संगणकीय कार्यप्रणाली व इतर दस्तऐवजनुसार ही गाडी प्रत्यक्षात भरून संघाच्या आवाराबाहेर गेलेली नाही. सदरील वाहनांच्या चुकीच्या नोंदणीमुळे हे दिसून येत आहे, की १४ टन लोणी साठा रेकॉर्डपेक्षा कमी आहे. या साठ्याची भौतिक पडताळणी रात्री अडीचपर्यंत सुरू होती. कार्यकारी संचालक त्या ठिकाणी उपस्थित होते. आता वाई येथे ज्या शीतगृहात साठा ठेवण्यात आला आहे, तेथे किती साठा आहे, हे तपासणीसाठी ९ ऑक्टोबरला संघाने अधिकारी व सुरक्षा कर्मचारी व अंतर्गत लेखापरीक्षक याचे पथक मे. पी. डी. शहा कोल्ड स्टोरेज, वाई येथे रवाना केले आहे. त्याठिकाणी किती साठा आहे, हे तपासणी केल्यानंतर पुढील अधिक तपशील मिळणार आहे. त्यानंतर मंगळवारी (ता. ११) संघाकडे असलेली दूध भुकटीच्या साठ्याच्या पडताळणीचे निर्देश कार्यकारी संचालकांनी दिले. त्यामध्ये सुद्धा सुमारे नऊ टन अंदाजित किंमत रुपये ३० ते ३५ लाख हा रेकॉर्डपेक्षा कमी आढळून आला.

दोघे निलंबित

या प्रकरणी दूध भुकटी व लोणी यांचे विभागप्रमुख महेंद्र नारायण केदार व विक्री विभागाचे प्रमुख अनंत ए. अंबीकर यांना मंगळवार (ता. ११) निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येत असून, चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी सांगितले. या वेळी संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये उपस्थित होते.

दोषींवर कारवाई व्हावी : आमदार खडसे

आमदार खडसे म्हणाले, की चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे. गेल्या सहा- सात महिन्यांत अधिकारी स्तरावर हा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणी पोलिस तक्रार देण्यात येत आहे. मात्र संघातर्फे अंतर्गत चौकशीही करण्यात येईल त्यातून जे निष्पन्न होईल त्याची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करण्यात येईल. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी संचालकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT