Jalgaon News : चहार्डी (ता. चोपडा) येथील विद्यमान सरपंच चंद्रकला दत्तात्रय पाटील यांच्या मनमानी आणि गैरकारभाराला कंटाळून १७ सदस्यांपैकी १६ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली होती.
या वेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने नऊ सदस्यांनी मतदान केले तर ठरावाच्या विरोधात विद्यमान सरपंच चंद्रकला पाटील यांनी मतदान केले. मात्र, यावेळी सात ग्रामपंचायत सदस्य गैरहजर होते. त्यामुळे सरपंचांवरील अविश्वास ठराव नऊविरुद्ध एक मतांनी फेटाळला गेला. (mismanagement of incumbent Sarpanch Chandrakala Dattatray Gram Panchayat members filed a no confidence motion jalgaon news)
चहार्डी येथील ग्रामसचिवालयात सोमवारी (ता. ५) सकाळी अकराला तहसीलदार भाऊसाहेब राऊत यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावावर चर्चा व मतदानासाठी विशेष सभा बोलविण्यात आली होती.
या वेळी अविश्वास ठरावावरील चर्चेला सुरवात करताना ग्रामपंचायत सदस्य गणेश रमेश पाटील यांनी नोटीशीतील नमूद सर्व मुद्दे योग्य असल्याचे नमूद करून सरपंच चंद्रकला पाटील या ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज करतात.
तसेच चौदावा वित्त आयोग व इतर कामांमध्ये गैरव्यवहार झाला असून, त्या संबंधी कागदपत्रे सभागृहात दाखविले तर ज्येष्ठ सदस्य अनिल रामदास पाटील यांनी ग्रामपंचायतींची निविदा प्रक्रिया व आर्थिक कामकाजासंदर्भात आक्षेप नोंदवून सरपंच चंद्रकला पाटील यांच्याकडून सदस्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगितले.
त्यानंतर अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. या वेळी ठरावाच्या बाजूने ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, गणेश पाटील, अर्जुन कोळी, दिनकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सिंधूबाई चौधरी, माधुरी सोनवणे.
जयश्री पाटील, हर्षदा कोळी अशा नऊ सदस्यांनी मतदान केले तर अविश्वास ठरावाच्या विरोधात सरपंच चंद्रकला पाटील यांनी मतदान केले. मात्र, अलकाबाई भिल, ललिताबाई धनगर, किरण मोरे, तुळशिराम कोळी, स्नेहल पाटील, क्रांती पाटील, मनीषा शेटे असे सात सदस्य गैरहजर होते.
त्यामुळे सरपंचांवरील अविश्वास ठराव नऊविरुद्ध एक मतांनी फेटाळला गेल्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी जाहीर केले. अविश्वास ठरावाच्या कामकाजासाठी निवडणूक शाखेतील लिपिक कपिल चौधरी, तलाठी मुकेश देसले, ग्रामविकास अधिकारी कुमावत यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.