police investigation inset rohit kopekar esakal
जळगाव

बेपत्ता रोहितचा खून झाल्याचा संशय; पोलिसांना सापडला होता सांगाडा

चेतन चौधरी

भुसावळ (जि. जळगाव) : शहरात वांजोळा-मिरगव्हाण हद्दीमध्ये रविवारी (ता. ५) सकाळी रोहित दिलीप कोपरेकर याचा मृतदेह (Body) सापडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, ३० मेपासून बेपत्ता असलेला रोहित याचा मृत्यू हा खूनच (Murder) असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र शवविच्छेदन (Post Mortem) अहवाल आल्यानंतरच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली. (Missing Rohit suspected of being murdered Jalgaon Crime news)

रोहित कोपरेकर (वय २१) हा तरुण ३० मेस सायंकाळपासून बेपत्ता झाला होता. तर त्याचा मृतदेह ५ जूनला सकाळी आठच्या सुमारास मिरगव्हाण परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामागील शेतात आढळून आला. अज्ञात व्यक्तीचा मृतदेहाचा सांगाडा एका शेतात पडला असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यामुळे घटनास्थळी बाजारपेठ व तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश गोटला, पोलिस कर्मचारी सचिन पोळ, तालुका निरीक्षक विलास शेंडे व तालुका पोलिस ठाण्याचा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

चप्पल, पॅन्टवरून पटली ओळख

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांना शेतात मयताचा केवळ सांगाडा आढळून आला. तर मृत व्यक्तीचा चेहरा व अंगावरही मास नव्हते. पायात चप्पल व अंगात पॅन्ट या दोनच वस्तू होत्या. मात्र पोलिसांनी कौशल्य पणाला लावून मिसिंग रजिस्टरमध्ये नोंदवलेल्या वर्णनाद्वारे हा मृतदेह रोहित कोपरेकरचा असल्याची ओळख पटवली. या वेळी पोलिसांनी जळगाव येथील फॉरेन्सिक लॅबच्या पथकास पाचारण केले. या पथकाने मृतदेहाच्या अंगावरील कपडे व रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी घेतले. रोहीत हा एका दुकानात कामाला होता. त्याला वडील नसून आई व बहिण असल्याचे सूत्रांनी सांगितले.

डोक्यावर दगडाचा मार

मृतदेहाजवळ काही अंतरावर रक्ताने माखलेले दगड आढळून आले. त्यामुळे मृत्युपूर्वी मृत तरुण व आरोपींमध्ये झटापट झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. डोक्यावर दगडाचा मार केल्याचे डॉक्टरांना आढळले. भुसावळ ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शिवाजी गवळी व पंकज कोलते यांनी मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन केले. या वेळी डोक्याची कवटी पूर्णपणे फुटलेली होती. त्यामुळे डोक्यावर दगडाने मारले असावे, असा संशय डॉक्टरांनी पोलिसांजवळ व्यक्त केला. त्यामुळे हा खून असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

आईशी शेवटचे बोलणे झाले

३० मेपासून रोहित बेपत्ता असल्याची माहिती आहे. तर दोन जूनला तो हरविल्याची नोंद बाजारपेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अर्ध्या तासात घरी येतो एवढेच बोलणे त्याचे त्याच्या आईशी झाले असल्याची माहिती रोहितच्या आईने पोलिसांना दिली. त्यानंतर मात्र बोलणे झालेच नव्हते, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

'राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून गेलेल्‍या गद्दारांना पाडाच'; शरद पवारांचा अजितदादांच्या आमदारांना इशारा

Ajit Pawar: पार्थ पवार म्हणतात, भाजप-शिवसेनेसोबत गेल्याने आम्ही बदलणार नाहीत; आम्ही तर...

Fraud Calls : अलर्ट! या नंबरवरुन येणारे कॉल आहेत धोक्याचे; क्षणात होऊ शकतो मोबईल हॅक अन् अकाउंट रिकामं

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम, आता एक व्हावे लागेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT