MLA daughter tied rakhi to victim girl brother jalgaon news esakal
जळगाव

Rakshabandhan 2023 : आमदारांच्या कन्येने ‘त्या’ भावाला बांधली राखी! गोंडगाव येथे सहकुटुंब भेट

सकाळ वृत्तसेवा

Rakshabandhan 2023 : एकीकडे रक्षाबंधनाचा उत्सव सुरू आहे, दुसरीकडे गोंडगाव (ता. भडगाव) येथील ‘त्या’ चिमुकलीचा लहान भाऊ बहिणीच्या राखीपासून वंचित राहू पाहत होता.

मात्र, आमदार किशोर पाटील यांच्या कन्येने संवेदनशीलतेचे दर्शन देत सहकुटुंब गोंडगावला जाऊन त्या कुटुंबाची भेट घेऊन तिच्या भावाला भाऊ मानत राखी बांधली, तसेच आमदार किशोर पाटील यांनी त्या मुलाचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. आमदारांच्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (MLA daughter tied rakhi to victim girl brother jalgaon news)

गोंडगाव (ता. भडगाव) येथील आठवर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. आज रक्षाबंधन सणाचा सर्वत्र उत्सव सुरू होता. मात्र ‘त्या’ बालिकेच्या घरी शांतता होती. राखी बांधणारी बहीणच राहिली नाही. त्यामुळे राखी कोण बांधेल? असा प्रश्न ‘त्या’ बालिकेच्या लहान भावाला सतावत असावा.

पण, आमदार पाटलांची कन्या डॉ. प्रियांका पाटील हिने संवेदनशीलतेचे दर्शन देत स्वत: कुटुंबासह गोंडगावला जाऊन पीडित बालिकेच्या भावाला राखी बांधली. तुमची लेक जरी नसली, तरी मी तिची कमी तुम्हाला भासू देणार नाही, अशी ग्वाही तिच्या आई-वडिलांना दिली. या वेळी तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रूंनी घर केले होते.

आमदार उचलणार शिक्षणाचा खर्च

आमदार पाटील यांच्या कन्येने पीडित बालिकेच्या भावाला रक्षाबंधनानिमित्त राखी बांधल्यावर आमदारांनीही त्याच्या संपूर्ण शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तो जिथपर्यंत शिक्षण घेईल, तिथपर्यंत आपण त्याच्या शिक्षणाला सर्व खर्च करू, असे आमदार पाटील यांनी या ठिकाणी जाहीर केले.

या वेळी बालिकेचे वडील, आई, काका, काकू, डॉ. प्रियांका पाटील, सुमीत पाटील, युवराज पाटील, स्वप्नील पाटील, मच्छिंद्र शार्दूल, सुदर्शन कोळी, मयूर महाजन, बंटी पाटील, शरद पाटील, भडगाव शहरप्रमुख आबा चौधरी, रावसाहेब पाटील, प्रवीण ब्राह्मणे, राहुल पाटील, योगेश सूर्यवंशी, भूषण पाटील, विजय पाटील, दुर्गेश पाटील, वकार शेख आदी उपस्थित होते.

"गोंडगावची ‘ती’ कन्या त्यांची एकट्याची लेक राहिली नाही, तर ती संपूर्ण राज्याची लेक झाली आहे. त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या कुटुंबाला आधार देणे माझे कर्तव्य समजतो. त्याच भावनेतून माझ्या कन्येने चिमुकलीच्या भावाला राखी बांधली. याशिवाय, त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च मी उचलणार आहे. ‘त्या’ नराधमालाही कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत." - किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

RCB Squad IPL 2025: काहे दिया परदेस! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं 'विदेशी' प्रेम; भुवनेश्वर, कृणाल पांड्याची निवड ठरणार मास्टरस्ट्रोक

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT