MLA Mangesh Chavan giving greetings to the daughter of Anganwadi workers from Shubmangal Yojana. (archived) esakal
जळगाव

MLA Mangesh Chavan : शुभमंगल योजनेतून 67 कन्यांना आहेर! आमदार चव्हाणांची कर्तव्यनिष्ठा

सकाळ वृत्तसेवा

MLA Mangesh Chavan : आमदार मंगेश चव्हाण यांनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर यांच्या कन्येच्या विवाहात प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत करतात. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शुभमंगल कर्तव्य योजना नावाने गेल्या दोन वर्षांपासून ते हा उपक्रम निष्ठेने राबवत आहेत.

आतापर्यंत ६७ कन्यांना त्यांनी हा आहेर दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांची ही योजना राज्य किंवा देशपातळीवर राबवणे शक्य आहे. त्या दृष्टिकोनातून सरकारने विचार करावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. (MLA Mangesh Chavan helps anganwadi Asha worker daughter marriage with 25 thousand each jalgaon news)

अल्प मानधनावर काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका यांच्या एका मुलीच्या लग्नासाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत १ जानेवारी २०२२ पासून आमदार चव्हाण यांनी जाहीर केली होती.

स्वखर्चाने सुरू केलेल्या या उपक्रमाला त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शुभमंगल कर्तव्य योजना हे नाव दिले आहे. मागीलवर्षी ३५ व यावर्षी ३२ असे दोन वर्षात ६७ विवाह सोहळ्यासाठी १६ लाख ७५ हजारांची मदत श्री. चव्हाण यांच्याकडून देण्यात आली आहे.

भाऊ म्हणून शक्य ती मदत

सर्व बहिणींचा भाऊ म्हणून व भाचींच्या लग्नासाठी प्रत्येकी २५ हजारांची मदत देण्याची मोठी जबाबदारी बरोबरच त्यांच्या शासन दरबारी असो वा वैद्यकीय, कौटुंबिक अडचणी असो मी एक भाऊ म्हणून शक्य ती मदत नेहमी करणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आमदार चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती तथा शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांची या कामात मोलाची मदत होत असते. चाळीसगाव तालुक्यातील १५०० हून अधिक आशा, अंगणवाडी सेविका,मदतनीस,आरोग्यसेविका यांच्या सन्मानार्थ आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने भाऊबीज सोहळा आयोजित करण्यात येतो.

शासनाने योजना राबवावी

कन्यादान योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी जोडप्यांच्या पालकांना २० हजार रुपये आर्थिक मदत त्याचप्रमाणे विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ४ हजार रुपये इतकी मदत शासनामार्फत केली जाते.

मात्र त्यातही कीचकट प्रक्रिया आहे. आमदार चव्हाण हे स्वतः राबवत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शुभमंगल कर्तव्य योजनेचा लाभ अल्प मानधनावर काम करणाऱ्या या सर्व समाजातील महिलांना होत आहे. यात कुठल्याही प्रकारचे नियम व अटी नाही. या योजनेची दखल राज्य अथवा केंद्र सरकारने घ्यावी, हा सूर उमटत आहे.

"या सर्व भगिनींना शासनाकडून मिळणारे मानधन कमी आहे. एक भाऊ या नात्याने आपल्या भाचीच्या लग्नासाठी आपण काही आहेर स्वरूपात आर्थिक मदत व्हावी म्हणून मी २०२२ च्या भाऊबीज सोहळा व आशा अंगणवाडी सेविकेच्या एका मुलीच्या लग्नासाठी २५ हजार रुपये आहेर देण्याचे जाहीर केले आहे."- मंगेश चव्हाण आमदार चाळीसगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT