Jalgaon News : शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन आमदार सत्यजित तांबे यांनी दिले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवता वाढीसाठी प्रयत्न करा; अशा सूचनाही त्यांनी दिली.
जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, प्रभारी उपशिक्षणाधिकारी विजय पवार, सरला पाटील, संभाजी पाटील, प्रा. सुनील गरुड, प्रतिभा सुर्वे आदी उपस्थित होते. (MLA Satyajit Tambe say Strive to improve student quality Meeting regarding issues of teachers non teaching staff in district council Jalgaon News)
पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी
निवड व वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव प्रलंबित आहेत. ते लागू होण्यासाठी कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन परिपत्रक १३ ऑक्टोबर २०१६, तसेच १३ फेब्रुवारी २०२३ च्या मार्गदर्शन पत्रानुसार इयत्ता सहावी ते आठवीसाठी एकूण मंजूर पदापैकी १ ते ३ शिक्षकांनाच पदवीधर वेतनश्रेणी देय आहे.
दिलेल्या निकषान्वये परिगणना करून पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले.
विविध बिलांसाठी निधीची मागणी
मेडिकल बिल व इतर फरक बिले गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मंजूर केलेली नाहीत. या प्रश्नाला उत्तर देताना प्राथमिक शिक्षकांच्या वैद्यकीय देयकासाठी १० कोटी ९४ लाख ३८ हजार रुपयांची मागणी ३१ जानेवारी व २६ एप्रिल २०२३ च्या पत्रान्वये, तसेच केंद्रप्रमुखांच्या वैद्यकीय देयकासाठी १७ लाख २२ हजार ३१ रुपयांची मागणी ६ जून २०२३ च्या पत्रान्वये, इतर फरक बिलांसाठी प्राथमिक शिक्षकांसाठी ४३ कोटी ५१ लाख २ हजार रुपयांची अनुदानाची मागणी २६ एप्रिल २०२३ च्या पत्रान्वये केली आहे.
निवृत्त शिक्षकांच्या थकीत उपदान व अंशराशीकरण व त्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतनाच्या फरकाच्या रक्कमासाठी ७२ कोटी ७७ लाख ९२ हजार रुपयांचे अनुदानाची मागणी शिक्षण संचालकांकडे ११ जानेवारी व २६ एप्रिल २०२३ अन्वये मागणी केली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालकांकडून अनुदान उपलब्धतेनुसार नियमित वेतन अदा करण्यात येत असते. निकषानुसार परिपूर्ण प्राप्त प्रस्तावानुसार मुख्याध्यापक मान्यता प्रस्ताव तत्काळ निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येईल. प्रलंबित संच मान्यता दुरुस्तीसाठी संस्थेकडील प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे सादर केल्याचे उत्तर शिक्षण विभागाकडून देण्यात आले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सीईओ, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा गौरव
जिल्हा परिषद सीईओ डॉ. पंकज आशिया व प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त करीत शिक्षण विभागाच्या कामांबद्दल आमदार सत्यजित तांबे यांनी सीईओंचा सत्कार केला.
मात्र, सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी आधी प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांचा सत्कार करा. त्यानंतर माझा सत्कार करा, अशी मागणी केल्याने यातून सीईओंचा मोठेपणा दिसून आला. त्यानंतर विकास पाटील व डॉ. पंकज आशिया यांचा सत्कार आमदार तांबे यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.